घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावे लागेल; जयंत पाटील यांचा दावा

उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करावे लागेल; जयंत पाटील यांचा दावा

Subscribe

प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने पाठींबा दिला होता. महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्यांनाही त्यांनी पाठींबा दिला होता, असे पाटील म्हणाले

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणूक आणि विश्वासदर्शक ठरावावेळी पक्षादेश झुगारून मतदान केले. या सगळ्याचा निवाडा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय घटनापीठ नेमणार आहे. तीन-चार महिन्यांत या सगळ्याचा निकाल लागले. तेव्हा थोडं थांबा या निकालानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री करण्याची वेळ येईल, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी केले.

सर्वोच्च न्यायालयाने घटनापीठ नेमण्याची केलेली कृती अतिशय गंभीर आहे. विधिमंडळात जे काम झाले आहे, ते सर्वोच्च न्यायालयाने अतिशय गांभीर्याने घेतले आहे, हा त्यामागचा संदेश आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तींची नियुक्ती झाल्यावर या खंडपीठाचे कामकाज सुरु होईल. त्यातून या सगळ्याचा उलगडा होईल. त्याला काही काळ लागेल, मात्र देर है अंधेर नही है. असे जे म्हणतात ते सर्व यामध्ये घडेल, असे पाटील म्हणाले.

- Advertisement -

यावेळी जयंत पाटील यांनी राष्ट्रपती निवडणुकीत शिवसेनेने जाहीर केलेल्या भूमिकेचे समर्थन केले. ते म्हणाले, नेहेमीच त्यांना जो उमेदवार योग्य वाटतो, त्यांना त्यांनी पाठींबा दिलेला आहे. यापूर्वी प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने पाठींबा दिला होता. महाराष्ट्राच्या प्रतिभाताई पाटील काँग्रेसच्या उमेदवार होत्या, त्यांनाही त्यांनी पाठींबा दिला होता, असे पाटील म्हणाले.


मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा, शरद पवार यांचे पदाधिकाऱ्यांना आदेश


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -