घरमहाराष्ट्रकळवा खाडी पुलावरून राष्ट्रवादीकडून श्रेयवादाची लढाई; आव्हाड म्हणाले, आपले स्वप्न पूर्णत्वाला

कळवा खाडी पुलावरून राष्ट्रवादीकडून श्रेयवादाची लढाई; आव्हाड म्हणाले, आपले स्वप्न पूर्णत्वाला

Subscribe

ठाण्यातील कळवा ब्रिज आणि मुंब्रा ब्रिज उद्घाटनावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून सत्ताधारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात श्रेयवादीची लढाई सुरु झाली आहे. दरम्यान या पुलाच्या उद्धाटनापूर्वी शिंदे गट आणि राष्ट्रवादीने पोस्टबाजी केली आहे. अशात या पुलासाठी आम्ही पाठपुरावा केल्याचा दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. याबाबत आव्हाडांनी एक भलीमोठी पोस्ट केली आहे.

ज्यात आव्हाड म्हणाले की, कळवा ब्रिज आणि मुंब्रा ब्रिज आज या दोन्ही पुलाचे उदघाट्न होतं आहे याचा मला मनापासून आनंद आहे. गेले 2 महिने मी सातत्याने ही मागणी करत होतो कि मुख्यमंत्र्यांनी वेळात वेळ काढून ह्या दोन्ही पुलाचे उदघाट्न करावे. खरंतर हे उदघाट्न आम्ही आमच्या पद्धतीने पार पाडू शकलो असतो. पण सामंजस्य दाखवून ह्या पुलाचे उदघाट्न मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते व्हायला हवं; कारण का माझ्या मतदार संघातील एवढ्या मोठ्या कामाचे उदघाट्न मुख्यमंत्र्यांनी केले ह्याचा मला आनंद लुटायचा होता. आणि आज त्याचे उदघाट्न होत आहे. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा आभारी आहे.

- Advertisement -

ह्या ब्रिजचा इतिहास असा आहे, कि जेंव्हा पहिला ब्रिज खचला आणि दुसऱ्या ब्रिजवर प्रचंड लोड यायला लागला आणि मुंब्रा कळव्यामध्ये प्रचंड ट्राफिक जाम व्हायला लागली, तेव्हा पहिल्यांदा 2009 साली मी आमदार झालो असताना तेव्हापासून मी ह्या तिसऱ्या ब्रिजची मागणी करत होतो. ठाणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त असीम गुप्ता यांनी अखेरीस ही मागणी मान्य केली. आणि तिसऱ्या ब्रिजच्या कामाला सुरुवात झाली. आणि आज त्याचे उदघाट्न आहे. मी कळव्यासाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होतं आहे याचा मला निश्चितच आनंद आहे.

मुंब्र्याच्या ब्रिज बाबतही सांगायचे झाले तर… पहिल्यांदा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे काळसेकर ईमारतीच्या उदघाट्नाला आले होते. इथे पहिल्यांदा मी ही मागणी पुढे केली. आणि त्यानंतर अशोक चव्हाण यांच्या काळात हे काम सुरु झाले. पृथ्वीराज चव्हाण तसेच नंतरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी या कामाला खूप मदत केली. आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ह्या कामाचे उदघाट्न होत आहे.

- Advertisement -

ह्या दोन्ही पुलाच्या मागे माझी स्वतःची मागणी आणि पाठपुरावा हे कोणिही नाकारू शकतं नाही. कळवा-मुंब्र्यातील समस्त नागरिकांना माहीत आहे कि ह्या दोन्ही ब्रिजच्या मागे जितेंद्र आव्हाड यांची भूमिका काय होती.

MMRDA ने तसेच ठाणे महानगरपालिकेने ह्या दोन्ही ब्रिजेसचे काम पूर्ण केल्याबद्दल मी त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचा देखिल आभारी आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनीही वेळोवेळी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल त्या दोघांचेही मी आभार मानतो.

2009 च्या पहिल्या निवडणूकीत पाहिलेलं स्वप्न आज 2022 साली पूर्ण होतं आहे. आपले स्वप्न पूर्णत्वाला जाताना प्रत्येकाला आनंद होतं असतो. तसाच आनंद मला होतं आहे. कळवा आणि मुंब्रा परिसरातील ट्राफिक जाम हा मोठा विषय आहे त्याच्यात थोडासा हातभार लागेल एवढाच माझा प्रामाणिक प्रयत्न होता.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांच्याकडे मी मागणी केली होती कि, जो नवीन कळव्याचा ब्रिज आहे त्याच्या बाजूने ब्रिज तयार करुन तो पटनीच्या रस्त्यापर्यंत नेण्यात यावा. जेणेकरुन त्या ठिकाणी कधीच वाहतूक कोंडी होणार नाही. आजही या ब्रिजची उतरण्याची जी जागा आहे, याचा विचार केला तर वाहतूक कोंडी कमी होणार नाही. मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये देखील मला शब्द दिला होता कि, हा ब्रिज आपण MMRDA मार्फत करुन घेऊ. आज त्याचे पूर्ण सर्वेक्षण झालेले आहे. त्याचा DPR तयार आहे. तेव्हा हे काम लवकरात लवकर करावी अशी विनंती आव्हाडांनी केली आहे.


ठाकरे गटाला आणखी एक धक्का; 1000 कार्यकर्त्यांसह हा मोठा नेता करणार शिंदे गटात प्रवेश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -