घरट्रेंडिंग'नाईकांचा छा… छैया बघायला तयार रहा'

‘नाईकांचा छा… छैया बघायला तयार रहा’

Subscribe

गेले दोन दिवस राज्यात राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड आणि गणेश नाईक यांच्यात शाब्दिक वॉर सुरू आहे. वी मुंबईत भ्रष्टाचार आणि खंडणी नाईकांच्या आशीर्वादाने चालत असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश करणाऱ्या गणेश नाईक यांच्यावर टीका करताना ठाणे जिल्ह्य़ात त्यांना पक्ष संपवला असा आरोप केला होता. त्यावर गणेश नाईकांनी फिल्मी स्टाईल उत्तरही दिलं, आव्हाड यांनी ट्विटरवरून नाईक यांच्यावर निशाणा साधला. यावर पुन्हा एकदा आव्हाड यांनी टीका केली असून आता आता गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार राहा, असं म्हटलं आहे.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये लिहीलं आहे की, ‘मी एकदा काय नवी मुंबईत जाऊन भाषण केलं, गणेश नाईकांनी कथकल्ली सुरु केली. अजूनतर मी शंभरवेळा जाणार आहे आणि त्याच्यानंतर माझा बापही येणार आहे. नवी मुंबईकरांनो गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार रहा.’

काय म्हणाले आव्हाड ?

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना ठाण्यात गणेश नाईक यांनी पक्ष संपवला असा आरोप गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. नवी मुंबईत भ्रष्टाचार आणि खंडणी नाईकांच्या आशीर्वादाने चालत असल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला. त्यांनी मलाही संपवण्याचा डाव आखला होता, असा दावा देखील आव्हाड यांनी केला. गणेश नाईक यांच्यामुळे ठाणे- कल्याण- डोंबिवली- अंबरनाथ शहरांमध्ये पक्षाची ताकद संपली असे शरद पवार यांच्या निदर्शनास आणले होते. मात्र, पवार यांचा माझ्यापेक्षा जास्त नाईक यांच्यावर विश्वास होता, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

काय म्हणाले गणेश नाईक?

गणेश नाईक यांनी “ये तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल और नाम पुछे तो बोल गणेश नाईक” असे हटके उत्तर दिले आहे.
“कोणीतरी म्हणतो गणेश नाईक खंडणी बहाद्दर आहे, पण गणेश नाईकवर एक एनसीदेखील नाही. हिंमत असेल तर गणेश नाईक खंडणी बहाद्दर असल्याचे पुरावे घेऊन गुन्हा दाखल करा,” असे गणेश नाईक यांनी आव्हाडांच्या भ्रष्टाचार आणि खंडणीच्या आरोपांवर उत्तर देताना आव्हाडांना आव्हान दिले आहे. मुलगा संदीप नाईकचा बळी दिला नसल्याची पुष्टी गणेश नाईक यांनी यावेळी दिली. “आपण संदीपला निवडणूक लढ म्हणून सांगितले होते हे कार्यकर्त्यांना माहिती आहे,” असे गणेश नाईक म्हणाले.


हे ही वाचा – “तेरे बस की बात नहीं, तेरे बाप को बोल” नाईकांचा आव्हाडांना फिल्मी स्टाईल टोला


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -