घरठाणेबेकायदेशीर बांधकामे : जितेंद्र आव्हाडांच्या 'त्या' व्हायरल क्लिपमध्ये काय? वाचा सविस्तर

बेकायदेशीर बांधकामे : जितेंद्र आव्हाडांच्या ‘त्या’ व्हायरल क्लिपमध्ये काय? वाचा सविस्तर

Subscribe

ठाणेनजीक असलेल्या कळवा परिसरात 29 बेकायदा बांधकामे सुरू आहेत, असा आरोप माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.

ठाणेनजीक असलेल्या कळवा परिसरात 29 बेकायदा बांधकामे सुरू आहेत, असा आरोप माजी गृहनिर्माण मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला. जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेच्या कळवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्यासोबतच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल केली आहे. (NCP Jitendra Awhad viral clip of illegal construction)

या व्हायरल क्लिपमध्ये कळव्यात 29 बेकायदा बांधकामे सुरू असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे. तसेच, बांधकामे उभी करण्यासाठी तुम्ही पैस घेता आणि पाडताना माझे नाव लोकांना सांगता. एका बांधकामांसाठी तुम्ही पैसे घेतले आहेत, असा आरोप करत, कोणामार्फत पैसे घेतले, ते उघडकीस करणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी संभाषण क्लिपमध्ये बोलताना दिसत आहे.

- Advertisement -

जितेंद्र आव्हाडांच्या ऑडिओ क्लिपमध्ये काय?

  • जितेंद्र आव्हाड : रोहितदास पाटीलला काय सांगितलं की मी, जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं कारवाई करायला.
  • सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर : नाही सर.
  • जितेंद्र आव्हाड : मला स्वत: रोहिदास पाटलांनी सांगितलं की तुम्ही त्यांना सांगितलं की, मी सांगितलं कारवाई करायला.
  • सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर : ‘नाही.
  • जितेंद्र आव्हाड : रोहितदास पाटलांच्या बिल्डिंगच्या बाजूला तुम्हाला इतर बिल्डिंग दिसल्या नाही, अनधिकृत.
  • सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर : हो सर त्यांच्यावरही कारवाई केली.
  • जितेंद्र आव्हाड : काय केली?
  • सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर: ”आज आज सर रोहित पाटलांवरच केली आहे.”
  • जितेंद्र आव्हाड : आता पुढे काय करणार तुम्ही?
  • सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर : नाही सर पहिले तेच टार्गेट केलं आहे, नवीन बांधकाम सुरूच करू द्यायचं नाही.
  • जितेंद्र आव्हाड : ते ठीक आहे, पण जे झालंय ग्राऊंड प्लस सेव्हन त्याला बघू पण नका म्हणजे ते पूर्ण करून पैसे कमवतील
  • सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर : नाही सर तसं नाही आहे.
  • जितेंद्र आव्हाड : अरे तुम्ही रोहिदास पाटलांकडून 20 लाख रुपये घेतले.
  • सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर : सर आता हे काही आरोप करत आहात.
  • जितेंद्र आव्हाड : काही आरोप करतायत, देणाऱ्या माणसाला उभा करू का समोर…तुम्ही कोणाच्या हातातून पैसे घेतले माहित आहे का तुम्हाला.. लोकांना वेडे समजलात का..जरा आवरतं घ्या.

या व्हायरल ऑडिओ क्लिपवर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी “एकाच्या मागे उभे राहायचे त्याच्या इमारती होऊ द्यायच्या. मात्र, आमच्या कार्यकर्त्यांच्या इमारती होत असतील, तर त्या तोडायच्या आणि सांगायचे जितेंद्र आव्हाड यांनी तोडायला सांगितले. ते सगळे बंद करा, असे मी आयुक्तांना १० वेळा सांगितले. त्यावर ते म्हणाले, विटाव्याचे मला वाईट हे वाटत की, उद्या जर ती बल्डींग ढासळली, तर कमीत-कमी 200 लोकांचा मृत्यू होऊ शकतो. ते म्हणाले, यात सरळ अधिकाऱ्यांचा हात असून त्यांचा भाव ठरलेला आहे. याबाबत अनेकवेळा सांगूनही काही होत नाही”, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – सरकारने एसटीचे ६०० कोटी थकवले; काँग्रेसचा आरोप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -