…तर गर्दीत रोज शेकडोंनी विनयभंग होतात; आव्हाडांवरील दाखल गुन्ह्यानंतर पत्नीचं ट्विट

jitendra awhads wife on ruta awhad motive of woman accusing jitendra awhad

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्याने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. आव्हाडांवर गुन्हा दाखल झाल्याने राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनीही या कारवाईबाबत सवाल उपस्थित केला आहे. ज्या महिलेने आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल केला ती महिलाच जामिनावर बाहेर असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे, तसेच एका वेगळ्या उद्देशाने हेतूने आव्हाडांविरोधात महिलेने तक्रार केल्याचा आरोपही ऋता आव्हाड यांनी केला आहे. या कारवाईवर ऋता आव्हाड यांनी ट्विट केले आहे. (ncp jitendra awhads wife ruta tweet on molestation case filed against jitendra awhad)

आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी ट्विट करत म्हटले की, जितेंद्र आव्हाडांविरोधात ज्या महिलेने ही तक्रार दाखल केली आहे. त्यांच्याकडे मोटीव्ह आहे. छटपुजेवरुन झालेल्या बाचाबाचीत संबंधित महिलेविरोधात अनेक गुन्हे दाखल असून त्या जामिनावर बाहेर आहेत. यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस व जितेंद्र आव्हाडांविरोधातही त्या आक्षेपार्ह बोलल्या आहेत.

अंगावर धडकणाऱ्या व्यक्तिला बाजूला करणे गुन्हा असेल तर बाजारात, ट्रेन मध्ये, रेल्वे पुलावर, गर्दीमध्ये रोज शेकड्यांनी ‘विनयभंग’ होत असतील. असंही ऋता आव्हाड म्हणाल्या.

ऋता यांनी पुढे म्हटले की, जितेंद्र आव्हाडांविरोधात तक्रार करणाऱ्या महिला राजकारणी मह्तत्वकांक्षा बाळगतात. काल रात्री त्या कुणाला तरी भेटल्या. त्यांच्यावर पण अ‌ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला आहे. जे काही घडलं ती spontaneous reaction होती. त्याला विनयभंग म्हणतां येत नाही.

नेमकी घटना कायय़

रविवारी कळवा आणि ठाणे शहराला जोडणाऱ्या तिसऱ्या कळवा खाडी पुलाचे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक राजकीय नेते कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप तक्रारदार महिलेने केला. त्यानंतर आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांकडून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल होताच ठाण्यातील मुंब्रा बायपास रोडवर त्यांच्या समर्थकांनी तीव्र आंदोलन केले आहे. या रोडवर टायर जाळत आंदोलकांनी आपला निषेध व्यक्त केला आहे. दरम्यान अनेक कार्यकर्त्यांनी सकाळपासून मुंब्रा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले आहे.


मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देतोय; जितेंद्र आव्हाडांचं ट्विट