घरमहाराष्ट्र'संजय शिरसाटांचे ट्विट तांत्रिक चुकीमुळे नाही तर....' राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला

‘संजय शिरसाटांचे ट्विट तांत्रिक चुकीमुळे नाही तर….’ राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला

Subscribe

शिवसेनेविरोधात बंडखोरी करत डझनहून अधिक आमदार शिंदे गटात सहभागी झाले. यात संजय शिरसाट देखील शिंदे गटाला पाठींबा दिला. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. यात शिंदे समर्थक आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कुटुंब प्रमुख असा उल्लेख करत त्यांचे विधानसभेतील एक भाषण ट्विट केले होते. हे ट्विट प्रचंड व्हायरल झाले मात्र काही वेळात शिरसाटांनी ते ट्विट डिलीट केले. यावरून आता शिरसाट शिंदे गटावर नाराज असून ते घरवापसी करणार असल्याची चर्चा आहेय. मात्र पत्रकार परिषद घेत शिरसाट यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिले आहे. मोबाईलच्या टेक्निकल प्रॉब्लेम ती ही पोस्ट व्हायरल झाली होती, मात्र मी एकनाथ शिंदेंसोबतच आहे, यामुळे मंत्रिपदासाठी दबाव कोणताही दबाव नाही, अस त्यांनी स्पष्ट केले. ज्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी संजय शिरसाटावर टोला लगावला आहे.

मी एकनाथ शिंदेंसोबतच, ते ट्वीट टेक्निकल प्रॉब्लेममुळे, संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण

आमदार संजय शिरसाट यांनी केलेले ट्वीट हे तांत्रिक चुकीमुळे नव्हते तर तो त्यांचा अंतरआत्म्याचा आवाज होता असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी लगावला आहे.

- Advertisement -

आमदार संजय शिरसाट हा त्यांचाच आवाज नव्हता तर बंड केलेल्या अनेक आमदारांना आपण चूक केली असं वाटायला लागलं आहे. ट्वीट डिलीट करुन लगेच ते तांत्रिक चुकीमुळे झाल्याचे आमदार संजय शिरसाट सांगत असले तरी त्यांच्या चेहर्‍यावरील भाव आणि देहबोली खूप काही स्पष्ट करत होती असेही महेश तपासे म्हणाले.

आमदार संजय शिरसाट यांच्या ट्वीटनंतर या आमदारांना सत्तेचं लालच दाखवून घेण्यात आल्याचे कारस्थान भाजप व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे असा थेट आरोप करतानाच हे सगळं जनता उघड्या डोळ्यांनी बघत आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले.


मी एकनाथ शिंदेंसोबतच, ते ट्वीट टेक्निकल प्रॉब्लेममुळे, संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -