घरमहाराष्ट्रकोड्यात न बोलता स्पष्ट बोलावे; अजित पवारांचं 'हे' विधान नेमकं कोणासाठी?

कोड्यात न बोलता स्पष्ट बोलावे; अजित पवारांचं ‘हे’ विधान नेमकं कोणासाठी?

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काही वर्षांपूर्वी घेतलेल्या पहाटेच्या शपथविधीवरून एक मोठं विधानं केलं. या विधानामुळे राज्यातील राजकारणात खळबळ उडाली आहे. पहाटेचा शपथविझी ही पवारांची खेळी असू शकते, असं विधान जयंत पाटील यांनी केलं आहे. यावरून आता राजकारणात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

जयंत पाटील यांनी केलेल्या विधानामुळे मात्र अजित पवारांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यामुळे अजित पवारांच्या भूमिकेवरही शंका घेतली जात आहे. मात्र यावेळी अजित पवार यांनी जयंत पाटील यांच्या विधानावर बोलण्यास नकार दिला. बीड दौऱ्यावर असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज जालनामध्ये माजी आरोग्यमंत्री आमदार राजेश टोपे यांच्या निवासस्थानी भेट दिली.

- Advertisement -

यावेळी माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे. त्यामुळे कोणी काय बोलावे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मात्र बोलताना कोड्यात बोलू नका, लोकांना कळेल असं स्पष्ट बोला, असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे. पण अजित पवार यांचा हा सल्ला नेमका कोणासाठी होता असा सवाल आता उपस्थित होत आहे. मात्र हा सल्ला भाजप नेते आशिष शेलार यांनाच असल्याची चर्चा रंगतेय. का तर त्याचं कारण आशिष शेलार यांनी केलेलं विधान..

जयंत पाटील यांच्या विधानावर आता भाजप नेत्यांकडूनही प्रतिक्रिया येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अडकवण्याचा प्लॅन करणाऱ्या मास्टर माईंडचे नाव लवकरचं जाहीर करणार असल्याचा दावा भाजप नेते अॅड. आशिष शेलार यांनी केला आहे. यावर पत्रकारांच्या एका प्रश्नावर अजित पवार म्हणाले की, मी अडीच वर्षे उपमुख्यमंत्री असताना माझ्या स्तरावर अशी कोणती चर्चा किंवा निर्णय घेण्यात आला नाही.

- Advertisement -

अजित पवार पुढे म्हणाले की, त्यांनी काही म्हटले की आम्हाला त्यावर प्रश्न केला जातो. देशात प्रत्येकाला व्यक्ती स्वतंत्र आहे, त्यामुळे कोणी काय बोलावं हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु बोलताना कोड्यात न बोलता स्पष्ट बोलावं तर लोकांना ही कळे असा सल्ला अजित पवार यांनी नाव न घेता भाजप नेते आशिष शेलार यांना दिला आहे.


दोन दिवस संप पण बँका राहणार चार दिवस बंद

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -