‘त्या’ वक्तव्याप्रकरणी अजित पवारांनी अखेर व्यक्त केली दिलगिरी, म्हणाले…

ncp leader ajit pawar apologized for wrongly mentioning savitribai fule

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाषणादरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर असा उल्लेख केला होता. या वक्तव्यावरून सत्ताधाऱ्यांनी आता त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र प्रकरण पेटण्याआधीचं अजित पवार यांनी आपली चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

पुणे येथील एका कार्यक्रमात भाषणावेळी अजित पवार यांनी हे वक्तव्य केलं होतं. यावर अजित पवार म्हणाले की, भाषणावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊं माँसाहेब’ या महामानवांचं स्मरण करताना, कर्तव्य सांगताना बोलण्याच्या ओघात माझ्याकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले ऐवजी क्रांतीज्योती सावित्रीबाई होळकर असा उल्लेख झाला, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य आपल्या सर्वांना माहित आहे. माझ्याकडून बोलण्याच्या ओघात झालेल्या चुकीच्या उल्लेखाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो, म्हणत अजित पवार यांनी आपली झालेली चुक सुधारली आहे.

अजित पवारांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा चुकीच्या झालेला उल्लेख मान्य करत माफी मागितली आहे. परंतु विरोधकांनी हाच मुद्दा हेरत अजित पवारांवर सडकून टीका केली. अजित पवारांकडून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबाबत चुकून झालेल्या उल्लेखाप्रकरणी भाजपचे आचार्य तुषार भोसले यांनी व्हिडीओ ट्विट करत माफी मागण्याची मागणी केली. यावेळी तुषार भोसले यांनी अजित पवार यांच्यावर टीकाही केली.

वाचाळवीर अजित पवार यांनी आधी संभाजी महाराजांच्या मुद्द्यावरून हिंदूंच्या भावना दुखावल्या आणि आता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला. आतातरी माफी मागणार की मग्रूरपणे ठाम राहणार असा प्रश्न उपस्थित करत आचार्य भोसले यांनी अजित पवारांवर टीकास्त्र डागले आहे.


Live Update : रविवारी हार्बर, ट्रान्स हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द