घरताज्या घडामोडीअहमदनगरमध्ये शेतकऱ्यांनी अडवला अजित पवारांच्या गाडीचा ताफा, शेतकऱ्यांची नक्की मागणी काय?

अहमदनगरमध्ये शेतकऱ्यांनी अडवला अजित पवारांच्या गाडीचा ताफा, शेतकऱ्यांची नक्की मागणी काय?

Subscribe

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या गाडीचा ताफा शेतकऱ्यांनी अहमदनगरमध्ये अडवल्याची घटना घडली आहे. अजित पवार आज अकोले तालुक्यातील अगस्ती साखर कारखाना निवडणूक प्रसारासाठी आले. मात्र,यावेळी शेतकऱ्यांनी त्यांच्या गाडीचा ताफा अडवला. त्यानंतर पवारांनी सीताराम गायकर यांचा प्रसार करू नये, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी अजित पवारांचा ताफा अडवल्यानंतर पोलिसांनी शेतकरी नेते दशरथ सावंत यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतरही पवारांचा निषेध करण्यात आला. ताफा अडवणारे शेतकरी मधुकर पिचड समर्थक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अजित पवारांना व्यासपीठावर जाऊन थेट सवाल करण्याचा इशारा दशरथ सावंत यांनी दिला होता, त्यामुळे पोलीसांनी सभेपूर्वीच सावंत यांना ताब्यात घेतले.

- Advertisement -

दरम्यान, अजित पवार आज अकोले तालुक्यात ऊस उत्पादकांच्या मेळाव्यात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा प्रचार करणार आहेत. या निवडणुकीत माजी मंत्री मधुकर पिचड, त्यांचे पुत्र वैभव पिचड यांच्या विरोधात गायकर यांनी रणशिंग फुंकले आहे.


हेही वाचा : मंत्रीमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिंदे, फडणवीसांचं आमदारांना हॉटेलवर निमंत्रण

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -