घरमहाराष्ट्रमहाराष्ट्रात 'राष्ट्रवादी'चं मोठा विरोधी पक्ष; अजित पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

महाराष्ट्रात ‘राष्ट्रवादी’चं मोठा विरोधी पक्ष; अजित पवारांचं फडणवीसांना प्रत्युत्तर

Subscribe

अजित पवार म्हणाले की, फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करु नये. 36 जिल्ह्यांपैकी आम्ही साडेतीन जिल्ह्यांपुरते मर्यादित असू तर त्यांच्यासमोर कोणी विरोधकच नाही.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली आहे. या टीकेला आता अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते साताऱ्यात पत्रकारांशी बोलत होते.

अजित पवार म्हणाले की, फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करु नये. 36 जिल्ह्यांपैकी आम्ही साडेतीन जिल्ह्यांपुरते मर्यादित असू तर त्यांच्यासमोर कोणी विरोधकच नाही. कारण शिवसेनेची त्यांनी काय अस्वस्थ केली, आम्ही तर साडेतीन जिल्ह्यातील आहोत. काँग्रेसबद्दलही असेच दावे असतात. काँग्रेस संपली पाहिजे, असं ते वक्तव्य करतात. ( NCP leader Ajit Pawar Criticized devendra Fadnavis over NCP statement )

- Advertisement -

फडणवीस काय म्हणाले?

राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय डोंबलं करणार? इथं राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलिभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्यांच काय करायचे बघतो. अशी टीका राज्याचे देवेंद्र फडणवीस यांनी निपाणीमधील सभेतून केली होती. त्यांच्या या टीकेला आता अजित पवार यांनी उत्तर दिलं आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कोणाला विजय मिळेल? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारण्यात आला. आता काही सांगता येत नाही. आपण कोणीही ज्योतिषी नाही. प्रत्येकजण आपापल्या परिने सांगतो. सुरुवातीच्या काळात काँग्रेसचं वातावरण चांगलंय असं मीडिायत सातत्याने वाचायला मिळत होतं. नंतर बजरंग दलाबद्दल भूमिका घेतल्यानंतर मग तिथे एकदम भाजपच्या मोठ्या नेत्यांना बजरंगाची मूर्ती देण्याची परंपरा सुरु झाली. भावनिक माध्यमातून निवडणुकीचं वातावरण वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करण्यात आला, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

- Advertisement -

काय म्हणाले अजित पवार ?

  • प्रत्येक सरकार धोका नाही, असंचं सांगत
  • परंतु अधिकाऱ्यांकडून मिळत असणारी माहिती वेगळी आहे.
  • निवडणुकीचं वातावरण वेगळ्या दिशेने नेण्याचा राज्यकर्त्यांना प्रयत्न कर्नाटकात सुरु आहे.
  • फडणवीसांनी आमच्या लोकांची काळजी करु नये

( हेही वाचा: शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता; अजित पवारांचा आरोप )

शरद पवार काय उत्तर देणार?

कोण पार्सल आहे हे देवेंद्र फडणवीस यांना निपाणीतून सांगेन. मी निपाणीला जाणार आहे. कोण पार्सल आहे? या सगळ्या संदर्भात मी तिथे बोलणार आहे, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता निपाणीत गेल्यानंतर शरद पवार फडणवीसांच्या टीकेला काय उत्तर देणार? याकडेच सर्वांच लक्ष आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -