मुख्यमंत्री रोड-शोमध्ये उतरल्याचे महाराष्ट्राने पहिल्यांदाच पाहिले; पवारांचा शिंदेंना टोला

'ही पोटनिवडणूक आता एकतर्फी राहिलेली नाही. चुरशीची लढत झाली आहे. त्यामुळे आम्हांला दोन्ही ठिकाणी यश मिळेल, यात शंका नाही. भाजपचे नेते ज्या पद्धतीने प्रचारात उतरले त्यावरुनच त्यांनी किती धसका घेतलाय', असे अजित पवार म्हणाले.

‘आजपर्यंत एवढ्या निवडणुका झाल्या. परंतु, मुख्यमंत्र्यांना रोड-शोमध्ये उतरावे लागल्याचे पहिल्यांदाच बघितले. यावरुनच ही निवडणूक कोण जिंकेल, ते ध्यानात येत आहे. चिंचवडमध्ये नाना काटे आणि कसब्यात रवींद्र धंगेकर यांच्या विजयासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी परिश्रम घेतले आहेत. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे’, असे अजित पवार म्हणाले. (NCP Leader Ajit Pawar Slams BJP On Kasba And Chinchwad By poll Election In Pune)

‘ही पोटनिवडणूक आता एकतर्फी राहिलेली नाही. चुरशीची लढत झाली आहे. त्यामुळे आम्हांला दोन्ही ठिकाणी यश मिळेल, यात शंका नाही. भाजपचे नेते ज्या पद्धतीने प्रचारात उतरले त्यावरुनच त्यांनी किती धसका घेतलाय’, असेही अजित पवार म्हणाले.

त्याशिवाय, ‘कसबा पेठ आणि चिंचवड येथे पोटनिवडणूको होणार आहेत. या निवडणुकीकडे महाराष्ट्रातील सर्व जनतेचे लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलेले आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी ही पोटनिवडणूक निर्णायक ठरणार आहे’, असेही अजित पवार म्हणाले.

‘महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी निर्माण झालेले शिवसेनेचे चिन्ह आणि पक्ष हे शिंदे गटाला देण्याचा वादग्रस्त निर्णय निवडणूक आयोगाने दिला. निवडणूक आयोगाच्या निर्णयावर आमचा आक्षेप नाही. तरीदेखील सर्वसामान्य जनतेला हा निर्णय मंजूर नाही. राज्यातील विधानसभेच्या दोन महत्त्वाच्या निवडणूक होत आहे. सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू आहे. परंतु, असे असतानाही निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय तडखाफडखी का दिला? याचा विचार करण्याची गरज आहे’, असेही अजित पवार म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मागील दोन-तीन दिवसांपासून पुण्यात प्रचार करत आहेत. तसेच, दुसरीकडे अजित पवार, आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक महाविकास आघाडीचे नेतेमंडळीही प्रचार करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये चुरस निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे.


हेही वाचा – जात, पात, धर्म या गोष्टींकडे आपला प्रचार वळवण्याचे काम भाजपसाठी नवे नाही – शरद पवार