घरताज्या घडामोडीमंत्रिपद मिळणार म्हणून काहींनी सूट शिवलेत...; अजित पवारांचा शिंदे गटावर हल्लाबोल

मंत्रिपद मिळणार म्हणून काहींनी सूट शिवलेत…; अजित पवारांचा शिंदे गटावर हल्लाबोल

Subscribe

'मंत्रिपद मिळणार म्हणून या चाळीस लोकांनी सूट शिवून ठेवलेले आहेत. परंतु, सहा महिने झाले तरी अद्याप घडी मोडलेली नाही', अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदारांवर हल्लाबोल केला.

‘मंत्रिपद मिळणार म्हणून या चाळीस लोकांनी सूट शिवून ठेवलेले आहेत. परंतु, सहा महिने झाले तरी अद्याप घडी मोडलेली नाही’, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षातील आमदारांवर हल्लाबोल केला. (NCP Leader Ajit Pawar Slams CM Eknath Shinde and dcm devendra Fadnavis)

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमावेळी नागरिकांना संबोधित करताना अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. “राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सर्वांना मान संधी मिळाली पाहिजे. राज्याचा गाडा चालवायचा असेल तर, काही मधल्या वयातील लोकांना आणि अनुभवी लोकांना सधी दिली पाहिजे. मात्र, तसे हे सरकार करत नाही. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच जणांना गाजर दाखवलं आहे. मात्र गाजर दाखवलं असलं तरी, ती चाळीस लोक अद्याप वाट बघत बसली आहेत की, माझा नंबर कधी लागणार आहे”, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

“मंत्रिपद मिळणार म्हणून या चाळीस लोकांनी सूट शिवून ठेवलेले आहेत. परंतु, सहा महिने झाले तरी अद्याप घडी मोडलेली नाही. तसेच, या आमदारांकडे कोणी अद्याप पाहिलेले नाही. हे नुसतेच वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अभिषेक करत आहेत. तसेच, देवाला नवस करत आहेत की, मला मंत्रिपद मिळालं तर मी नवस फेडायला येईन. मात्र, त्यांनी असे किती नवस केलेत माहित नाही”, अशा शब्दांत अजित पवार यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

“पण यांना भीती आहे की, जर मंत्रिपद दिली नाही तर, ही लोक आपल्याला सोडून जातील. यांच्या अशा वागण्यामुळे राज्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे आपल्या राज्यातील मोठे-मोठे प्रकल्प हे राज्याबाहेर जात आहेत. अनेक युवकांचे रोजगार गेले. आम्हाला अधिवेशनावेळी सभागृहात सांगितले की, हे प्रकल्प बाहेर गेले असले तरी आम्ही नवीन प्रकल्प महाराष्ट्रात आणू, परंतु अद्याप एकही प्रकल्प महाराष्ट्रात नाही”, अशीही टीका अजित पवारांनी केली.

- Advertisement -

स्थगिती सरकार

“महाविकास आघाडी सरकारच्या काळाता आम्ही बरेच निर्णय घेतले होते. परंतु, या सरकराने सर्वच निर्णयांना स्थगिती दिली आहे. हे घटनाबाह्य सरकार असून, स्थगिती सरकार देखील आहे”, अशा शब्दांत अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.


हेही वाचा – पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी मी सर्वपक्षीयांना फोनवरून विनंती केली – मुख्यमंत्री शिंदे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -