आदित्य ठाकरेंचे काम लोकांना बघवत नाही; अजित पवारांचा विरोधकांना टोला

'आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांचे हे काम काही लोकांना बघवत नाही', अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

संग्रहित छायाचित्र

‘आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांचे हे काम काही लोकांना बघवत नाही’, अशा शब्दांत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. (NCP Leader Ajit Pawar Slams CM Eknath Shinde and dcm devendra Fadnavis)

शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यावर औरंगाबाद इथे झालेल्या दगडफेकीचा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. “आदित्य ठाकरे हे त्यांच्या पद्धतीने चांगले काम करत आहेत. महाराष्ट्रात फिरत आहेत. त्यांचे हे काम काही लोकांना बघवत नाही. त्यामुळंच काही लोक अडवाअडवी आणि दगडफेकीसारखे प्रकार करत आहेत”, असे अजित पवार म्हणाले.

“सत्ता मिळाल्यानंतर लोकांसाठी राबवायची असते. रडीचा डाव खेळायचा नसतो. सत्ताधारी असो किंवा विरोधक, लोकशाहीत असं कुणीही करू नये”, अशी अपेक्षा अजित पवार यांनी व्यक्त केली.

त्याशिवाय, “आदित्य ठाकरे हे युवा नेतृत्व म्हणून वेगवेगळे दौरे काढत असून त्यांच्या दौऱ्याला चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. आपण मोठा निर्णय घेतल्यानंतर बाकीच्यांना असा प्रतिसाद मिळणार नाही, असे काही लोकाना वाटले होते”, असेही अजित पवार म्हणाले.

“कोकणातील उमेदवार म्हात्रे जे निवडून आले होते, ते भाजपाचे तिकीट मिळण्यापूर्वी शिवसेनेच्या शिक्षक संघटनेचे काम करत होते. उद्धव ठाकरे म्हात्रे यांना उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न करत होते. परंतु, विद्यमान उमेदवार असल्यामुळे तिकीट त्यांना देता आले नाही”, असेही पवार म्हणाले.


हेही वाचा – कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी मनसेची वेट अॅण्ड वॉच भूमिका