घरताज्या घडामोडी'तुम्ही भरती करणार असाल तर यादी दाखवा'; अजित पवारांनी सरकारकडे मागितला तपशील

‘तुम्ही भरती करणार असाल तर यादी दाखवा’; अजित पवारांनी सरकारकडे मागितला तपशील

Subscribe

आम्ही अनेक प्रकारचे प्रकल्प महाराष्ट्रात आणून भरती करणार आहोत. तुम्ही भरती करणार असाल तर यादी दाखवा, किती प्रकल्प येणार आहेत आणि किती भरती होणार आहे, याची माहिती द्या, असा तपशील राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकारडे मागितला.

आम्ही अनेक प्रकारचे प्रकल्प महाराष्ट्रात आणून भरती करणार आहोत. तुम्ही भरती करणार असाल तर यादी दाखवा, किती प्रकल्प येणार आहेत आणि किती भरती होणार आहे, याची माहिती द्या, असा तपशील राष्ट्रवादी कॉंग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी सरकारडे मागितला. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शुक्रवार व शनिवारी (4 ते 5 नोव्हेंबर) शिर्डी येथे राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यापार्श्वभूमीवर अजित पवार प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी महाराष्ट्रातील प्रकल्प बाहेर गेल्याने सरकारवर निशाणा साधला. (NCP Leader Ajit Pawar Slams CM Eknath Shinde and dcm devendra Fadnavis)

“आम्ही पण बरीच वर्षे सरकारमध्ये काम करत आहोत. आर. आर. पाटील असताना आम्ही दरवर्षी 13 हजार पोलिसांची भरती केली होती. त्यानुसार पाच वर्षे एकूण 65 हजार पोलिसांची भरती केली होती. मी मागील अडीच वर्षे अर्थमंत्री होतो. त्यापूर्वीही चार वर्षे अर्थमंत्री होतो. त्यावेळी भरती करण्यासाठी हवी असणारी योग्यती मान्यता आम्ही देतच असतो. त्यानुसार विविध विभागांची भरती आम्ही करतो. मात्र यांचे अपयश झाकण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकारने मोठे प्रकल्प ज्या माध्यमातून दीड लाख मुलांना रोजगार मिळणार होता. तसेच दीड ते दोन लाख कोटींची गुंतवणूक होती, असे प्रकल्प बाहेर गेले आणि आता सांगताहेत की, आम्ही अनेक प्रकारचे प्रकल्प महाराष्ट्रात आणून भरती करणार आहोत तुम्ही भरती करणार असाल तर यादी दाखवा, किती प्रकल्प येणार आहेत आणि किती भरती होणार आहे, याची माहिती द्या”, असे अजित पवार यांनी म्हटले.

- Advertisement -

“सध्या आपले प्रकल्प बाहेर गेल्याने महाराष्ट्रातील तरुणांच्या आणि तरुणींच्या मनात रोष आहे, नाराजी आहे. तरुणांच्या त्या नाराजीचा आपल्याला फटका बसू नये यासाठी, वरचेवर दिखावा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जर प्रकल्प आमच्या काळात गेला सांगत असाल, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे पत्र आता का लिहिले, याचेही उत्तर त्यांनी द्यावे”, असा टोलाही यावेळी अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.

याशिवाय, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशभरात वाढलेल्या महागाई आणि बेरोजगारीवरही अजित पवार यांनी भाष्य केले. “सध्याच्या सर्वे पाहिला असता देशात राज्यात महागाई आणि बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या महिन्यात बेरोजगारीने कळस गाठला आहे”, असे अजित पवार यांनी म्हटले.

- Advertisement -

हेही वाचा – औषधोपचार महागले तरी, एसटी कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून मिळतेय बिलांची तुटपूंजी रक्कम

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -