अजित पवारांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

ncp leader ajit pawar take oath for deputy chief minister fourth time
अजित पवारांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची घेतली शपथ

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी चौथ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यापूर्वी अजित पवार नोव्हेंबर २०१० रोजी, ऑक्टोबर २०१२, नोव्हेंबर २०१९ रोजी आणि सोमवारी ३० डिसेंबर रोजी शपथ उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यापैकी २०१० आणि २०१२ रोजी आघाडी सरकारच्या काळात ते उपमुख्यमंत्री होती. तर २३ नोव्हेंबर २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ८० तासांच्या सरकारमध्ये ते उपमुख्यमंत्री होते. आता चौथ्यांदा अजितदादांनी ३० डिसेंबर २०१९ रोजी ठाकरे सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी दोन वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवले असून ऑक्टोबर १९९९ आणि डिसेंबर २००८ रोजी भुजबळ उपमुख्यमंत्री होते. यापूर्वी एकदा उपमुख्यमंत्री पदी काम केलेले नासिकराव तिरपुडे, सुंदरराव सोंळखे, रामराव आदिक, गोपिनाथ मुंडे, आर.आर पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटील उपमुख्यमंत्री पदी होते.

या जिल्हांना मंत्रीपदासाठी स्थान नाही

१) गडचिरोली
२) गोंदिया
३) वर्धा
४) वाशीम
५) अकोला
६) परभणी
७) हिंगोली
८) उस्मानाबाद
९) सोलापूर
१०) सिंधुदुर्ग
११) पालघर


हेही वाचा – ठाकरे सरकारमध्ये महिलांना एक टक्क्याहून कमी स्थान; वाचा संपुर्ण मंत्रिमंडळाची यादी