Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी बाळू धानोरकरांचे निधन म्हणजे कधी न भरून निघणारी पोकळी; अजित पवारांकडून श्रद्धांजली...

बाळू धानोरकरांचे निधन म्हणजे कधी न भरून निघणारी पोकळी; अजित पवारांकडून श्रद्धांजली अर्पण

Subscribe

काँग्रसचे खासदार बाळू धानोरकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. काही दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर खासदार बाळु धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. अखेर आज बाळू धानोरकर यांनी दिल्लीतील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली.

काँग्रसचे खासदार बाळू धानोरकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. काही दिवसांपूर्वी बाळू धानोरकर यांच्या वडिलांचे निधन झाले होते. वडिलांच्या निधनानंतर खासदार बाळु धानोरकर यांची प्रकृती चिंताजनक झाली होती. अखेर आज बाळू धानोरकर यांनी दिल्लीतील मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच, ‘बाळू धानोरकर यांचे जाणं म्हणजे कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. ही भरून काढायचे बोलले तर ही अशक्य गोष्ट आहे’, असेही पवार म्हणाले. (NCP Leader Ajit Pawar Talk On Congress MP Balu Dhanorkar Death)

“बाळू धानोरकर यांचे आज पहाटे धक्कादायक निधन झाले. ही धक्कादायक बातमी आहे. कारण त्यांचे वय पण तरुण होतं. धानोरकर साहेब गेले, त्यावर आमचा विश्वास बसत नाही. मागील निवडणुकीच्या काळात ज्यावेळी जागावाटप सुरू होती. त्यावेळी बाळू धानोकर यांनी आमची भेट घेतली होती. कारण त्यांना त्याठिकाणी उमेदवारी पाहिजे होती. त्यावेळी मी त्यांना विचारलं की तुम्ही काय तयारी केली आहे? त्यावर “मी शिवसेनेत असलो. पण ती जागा भाजपासाठी सुटली असल्याने तयारी करूनही त्या जागेसाठी लढता येत नाही. त्यामुळे ती जागा काँग्रेसकडे असेल तर काँग्रेसने मला तिकीट द्यावी, राष्ट्रवादीनेही ती जागा मागून घ्यावी मी राष्ट्रवादीकडूनही लढायला तयार आहे”, असे धानोरकरांनी सांगितले होते. त्यावेळी शरद पवार यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करून त्याठिकाणी काँग्रेसचा उमेदवार म्हणून बाळू धानोरकर यांना संधी दिली”, असे अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा – Balu Dhanorkar passes away : चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

“2019 लोकसभा निवडणुकीत एवढ्या जबरदस्त लाटेत बाळू धानोरकर यांची वगळता काँग्रेसची एकही जागा आली नाही. मधल्या काळात मी उपमुख्यमंत्री असताना बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी माझ्याकडे अनेक समस्या घेऊन येत होत्या. चंद्रपूरचा कायापालट व्हावा अशी त्यांची सातत्यने भूमिका असायची. पाटपुरावा करण्यासाठी ते अतिशय कणखर नेतृत्व होते. पण गंभीर आजाराने त्यांना ग्रासल आणि दिल्लीला नेऊनही त्यांचे निधन झाले”, असेही अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा Balu Dhanorkar Death : काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांना राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

“मी विरोधी पक्षनेते पद स्वीकारले त्यावेळी त्यांच्या भागात पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे मी दौरा केला होता. त्यावेळी बाळू धानोरकर आणि त्यांच्या पत्नी तिकडे होत्या. चंद्रपुरात राष्ट्रवादीचे कार्यालय नव्हते. पण बाळू धानोरकर यांनी त्यांचे चंद्रपुरातील कार्यालय राष्ट्रवादी कार्यालयासाठी दिले. त्यामुळे कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. ही भरून काढायचे बोलले तर ही अशक्य गोष्ट आहे”, असे अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisment -