घरताज्या घडामोडीनवीन पायंडे पाडू नये; पुणे पोलिसांच्या 'त्या' मास्टर प्लॅनवर अजित पवारांची प्रतिक्रिया

नवीन पायंडे पाडू नये; पुणे पोलिसांच्या ‘त्या’ मास्टर प्लॅनवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोयता गँगच्या या  दहशतील आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी पुणे पोलिसांनी मास्टर प्लॅन आखला आहे. याच मास्टर प्लॅनवर आज राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोयता गँगमुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोयता गँगच्या या  दहशतील आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी पुणे पोलिसांनी मास्टर प्लॅन आखला आहे. याच मास्टर प्लॅनवर आज राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नये’, असे अजित पवार यांनी सांगितले. (NCP Leader Ajit Pawar Talk On Master Plan OF Pune Police For Koyata Gang)

“एखादा गुंड अजिबातच सापडत नसेल तर त्याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर केले जाते. वीरप्पन, चार्ल्स शोभराज सापडत नव्हते तेव्हा अशा प्रकारचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मात्र सरसकट बक्षीस जाहीर केले जात असेल तर पोलीस यंत्रणांपुढे प्रश्नचिन्ह निर्माण होतात. पोलिसांनी नवीन पायंडे पाडू नये”, असे अजित पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

पुणे शहरात कोयता गँगची दहशत वाढत आहे. तरुण हातात धारदार शस्त्रे (कोयता) घेऊन दहशत पसरवताना दिसत आहेत. तसेच याशिवाय चोरटे धारदार शस्त्रे दाखवून रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांना धमकावतात त्यामुळे सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

मास्टर प्लॅन काय?

- Advertisement -

पुणे शहर परिसरात गेल्या काही दिवसापासून कोयता गँगने धुमाकूळ घातला असून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे कोयता बाळगणार्‍याला पकडा आणि बक्षीस मिळवा, अशी योजना पुणे पोलिसांनी आखली आहे. या योजनेनुसार, पिस्तूल जवळ बाळगणार्‍या गुंडाला पकडल्यास दहा हजार तर, कोयता बाळगणार्‍याला पकडल्यास तीन हजार रुपये बक्षीस दिले जाणार आहे.

बक्षिसाचे स्वरूप

  • शस्त्र अधिनियम कलम ३, २५ नुसार दहा हजार रुपये
  • शस्त्र अधिनियम कलम ४,२५ नुसार तीन हजार रुपये
  • फरारी आरोपीस पकडणे १० नुसार हजार रुपये
  • पाहीजे आरोपीस पकडणे ५ हजार रुपये
  • मोक्कातील आरोपी पकडणे ५ हजार रुपये
  • एमपीडीएतील आरोपी पकडणे ५ हजार रुपये

हेही वाचा – ‘शिवसेना आता आघाडीमध्ये आली…’, अजित पवारांचे पोटनिवडणुकीबाबत स्पष्टीकरण

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -