घरमहाराष्ट्रसरकारमधील नाराज 12 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; मिटकरींचा खळबळजनक दावा

सरकारमधील नाराज 12 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; मिटकरींचा खळबळजनक दावा

Subscribe

मुंबई – शिवसेनतील बडे नेते एकानाथ शिंदे यांच्यासह 41 हून अधिक आमदारांच्या बंडखोरीमुळे राज्यातील ठाकरे सरकार कोसळून शिंदे- फडणवीस सरकारची सत्ता आली. यानंतर तब्बल महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री पद न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज असल्याचे उघड झाली, काही आमदारांनी तर खुलाआमपणे आपली नाराजी व्यक्त करून दाखवली, यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी मोठा दावा केला आहे.

शिंदे – फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री पद न मिळाल्याने शिंदे गटातील अनेक आमदार नाराज आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री जयंत पाटील गडचिरोली दौऱ्यावर असताना शिंदे गटातील अनेक आमदार त्यांच्या संपर्कात होते. असा खळबळजनक दावा राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी केला आहे. यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे.

- Advertisement -

दरम्यान संपूर्ण मंत्रिमंडळ विस्तार होत नाही, त्यात मंत्रिपद मिळेल असं आमदारांना वाटत नाही. त्यामुळे काही मंत्री शिंदे – फडणवीस सरकार सोडून राष्ट्रवादीत येण्याच्या मनस्थितीत आहेत. असे जवळपास 12 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आले आहेत. ज्याची माजी मंत्री जयंत पाटील यांच्याकडे नोंद आहे, अशी माहिती अमोल मिटकरी यांनी दिली आहे. दरम्यान मिटकरांच्या वक्तव्याबद्दल जयंत पाटलांनी याबाबत काही माहित नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे मिटकरांचे विधान राजकीय स्टंटबाजी असल्याची टीका केली जात आहे.

दरम्यान अलीकडे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी देखील शिंदे गटातील काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा केला होता. शिंदे गटातील 15 ते 16 आमदार मातोश्रीच्या संपर्कात असल्याचे खळबळजनक दावा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. मंत्रिपद न मिळाल्याने शिंदे गटातील आमदारांमध्ये उद्रेकता वाढतेय. यामुळे आपण उगीच मातोश्री आणि उद्धव ठाकरेंना सोडल्याची भावना आमदारांच्या मनात निर्माण झाल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला होता.


मुंबई, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांसाठी पावसाच्या दृष्टीने पुढील 24 तास महत्वाचे; IMD कडून इशारा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -