मुंबई – राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकता पार पडला. त्यानंतर मुंख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप आज (रविवारी) जाहीर केले.या खातेवाटपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
अमोल मिटकरींच्या ट्वीटमध्ये काय? –
शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली आहेत. गृह, अर्थ, महसूल, वने, ग्रामविकास, सहकार, जलसंपदा व सर्व महत्त्वाची खाती भाजपाने आपल्याकडेच ठेवून शिंदे गटाला दुय्यम स्थान दिले आहे. शिंदे गटातील मंत्र्यांना मविआ सरकारमधे असलेला सन्मान आता कमी झाला? असे मिटकरी यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
मुख्यमंत्री मा.शिंदे साहेबांच्या गटाला मंत्रिमंडळात तोंडाला पाने पुसली आहेत.गृह,अर्थ,महसूल,वने, ग्रामविकास, सहकार,जलसंपदा व सर्व महत्त्वाची खाती भाजपाने आपल्याकडेच ठेवून शिंदे गटाला दुय्यम स्थान दिले आहे.
शिंदे गटातील मंत्र्यांना मविआ सरकारमधे असलेला सन्मान आता कमी झाला?— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) August 14, 2022
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे या खात्यांचा कारभार –
खातेवाटपानुसार शिंदेंकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृदा व जलसंधारण, पर्यावरण व वातावर्णीय बदल, अल्पसंख्याक तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेल्या विभागांची जबाबदारी असणार आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, उर्जा, राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहेत.
खाते वाटप पुढीलप्रमाणे –
- राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
- सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
- चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
- डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
- गिरीष महाजन- ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण
- गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता
- दादा भुसे- बंदरे व खनिकर्म
- संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन
- सुरेश खाडे- कामगार
- संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन
- उदय सामंत- उद्योग
- प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
- रवींद्र चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण
- अब्दुल सत्तार- कृषी
- दीपक केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा
- अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
- शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
- मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास