घरताज्या घडामोडीराष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खान्देशाच्या राजकारणातील बडा चेहरा असलेला नेता अनिल भाईदास पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांना प्रकृतीत बिघाड झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले. त्यानंतर आता राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि खान्देशाच्या राजकारणातील बडा चेहरा असलेला नेता अनिल भाईदास पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. (Ncp leader anil bhaidas patil admitted in mumbai breach candy hospital)

आमदार अनिल पाटील यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्या पोटावर दोन तास शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टरांच्या माहितीनुसार, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना सध्या आरामाची आवश्यकता आहे.

- Advertisement -

अनिल भाईदास पाटील हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. अतिशय अटीतटीची ती लढत ठरली होती. शिवाय, अनिल पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद देखील आहे. खान्देशातील राजकारणात त्यांनी चांगले स्थान मिळवले आहे. अनिल पाटील यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत पाटील समाजाने चांगला प्रतिसाद दिला होता, अशी चर्चा निवडणुकीनंतर समोर आली होती.

दरम्यान, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या दिग्गज नेत्यांवर अनेक संकट ओढावताना दिसत आहेत. नुकतंच महाराष्ट्राचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याची माहिती समोर आली. त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनाही कोरोनाची लागण झाली.

- Advertisement -

हेही वाचा – आव्हाडांच्या बॉडीगार्डची आत्महत्या नव्हे तर… मोहित कंबोज यांचा गंभीर आरोप

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -