घरताज्या घडामोडी'गाय आई नाही' सावरकरांचा हा विचार भाजप स्वीकारणार का? - भुजबळ

‘गाय आई नाही’ सावरकरांचा हा विचार भाजप स्वीकारणार का? – भुजबळ

Subscribe

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. एका बाजुला भाजपने राहुल गांधी यांच्याविरोधात रान पेटवले आहे तर दुसऱ्या बाजुला महाराष्ट्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेनेही काँग्रेसला सुनावले आहे. मात्र यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र राहुल गांधी-सावरकर वादावर सावध प्रतिक्रिया दिली आहे. याबाबतीत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “सावरकर यांच्याबाबतीत राहुल गांधी यांचे स्वतःचे विचार आहेत. सावरकर यांनी सांगितले होती की, गाय ही आपली माता नाही. मात्र भाजप गाईला आई मानते. सावरकर हे विज्ञानवादी होते, मात्र भाजप याचा स्वीकार करेल का?” असा सवाल भुजबळ यांनी विचारला आहे.

राहुल गांधी यांच्या रेप इन इंडिया वक्तव्यावरुन लोकसभेत शुक्रवारी रणकंदन माजले होते. भाजपकडून राहुल गांधी यांनी माफी मागावी असी मागणी केली जात आहे. मात्र राहुल गांधी यांनी माफी मागण्यास नकार दिलाच. काँग्रेसतर्फे दिल्लीत भारत बचाओ रॅलीदरम्यान त्यांनी “माफी मागायला मी राहुल सावरकर नसून राहुल गांधी आहे”, असं देखील वक्तव्य केले आहे. यानंतर आता देशभरातील सावरकर प्रेमी राहुल गांधीवर तुटून पडत आहेत.

- Advertisement -

हे वाचा – …अन्यथा आम्हाला तोंड लपवावे लागले असते; रणजित सावरकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल

झारखंड येथे भाषण करत असताना राहुल गांधी यांनी देशात महिलांवर वाढलेल्या अत्याचारांबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया बनवू असे सांगितले होते. मात्र सध्या तुम्ही कुठेही बघा तुम्हाला मेक इन इंडिया नाही तर रेप इन इंडिया दिसेल.” राहुल गांधी यांच्या याच वक्तव्यावरुन शुक्रवारी लोकसभेत भाजपच्या महिला खासदारांनी आक्षेप घेत राहुल गांधींनी देशाची माफी मागितली पाहीजे, अशी मागणी लावून धरली.

- Advertisement -

हे देखील वाचा – सावरकरप्रेमींनी राहुल गांधींच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून जाळले


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -