राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या प्रकृतीत बिघाड; रुग्णालयातील डॉक्टर म्हणाले…

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृती बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. येवल्याहून नाशिकच्या दिशेने येत असताना अचानक भुजबळ यांची प्रकृती बिघडली. थंडी ताप वाढल्याने त्यांना तातडीने अपोलो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.

chagan bhujbal

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रकृती बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. येवल्याहून नाशिकच्या दिशेने येत असताना अचानक भुजबळ यांची प्रकृती बिघडली. थंडी ताप वाढल्याने त्यांना तातडीने अपोलो रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तपासणी करून त्यांना त्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे. (ncp leader chhagan bhujbal was admitted to hospital in nashik due to condition suddenly deteriorated)

मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने येवल्याला गेले होते. येवल्यावरून परत येत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. ताप आणि थंडी वाढल्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटत होते. त्यावेळी त्यांना तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तात्काळ त्यांना घरी जाण्यास मुभा देण्यात आली. सध्या भुजबळ यांची प्रकृती स्थिर आहे. घाबरण्याचे कोणतेही कारण नाही, असं डॉक्टरांनी सांगितले. सध्या भुजबळ हे नाशिक मधल्या घरी पोहोचले आहे.

दरम्यान आज प्रसारमाध्यमांशी बोलत असताना छगन भुजबळ यांनी नाशिकच्या वाढत्या गुन्हेगारीवरून शहर पोलीस आयुक्तांना इशारा दिला. ‘जे कोणी पोलीस आयुक्त आहेत, त्यांना गुन्हेगारी आवरावी लागेल. नाहीतर नाशिकच्या जनतेचा उद्रेक तुम्हाला पाहायला मिळेल. नाशिकच्या जनतेच्या वतीने आम्ही उठाव करू’, असा इशारा भुजबळांनी दिला.

“राहुल गांधी प्रकरण याचा ओबीसीशी संबंध नाही. मोदी साहेबांनी का नाही इम्पिरिकल डेटा दिला. तुम्ही ओबीसी लोकांना का पाठिंबा दिला नाही. जे लोक बाहेर पळून गेले, ते ओबीसी नाही. देशातले सगळे विरोधी पक्ष राहुल गांधी यांना सपोर्ट करत आहे. राहुल गांधी कर्नाटक मध्ये बोलले आणि केस सुरतमध्ये कशी झाली? यातील अनेक वेळा न्यायाधीश देखील बदलण्यात आले. जनतेचे कोर्ट मोठे कोर्ट असते, तिथे त्यांना न्याय मिळेल”, असेही भुजबळ म्हणाले.


हेही वाचा –