घरलोकसभा २०१९जरा हटकेमोदींच्या सभेपेक्षा बोरीवली स्टेशनला जास्त गर्दी; मोदींची सभा सोशल मीडियावर ट्रोल

मोदींच्या सभेपेक्षा बोरीवली स्टेशनला जास्त गर्दी; मोदींची सभा सोशल मीडियावर ट्रोल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महाराष्ट्रातील वर्धा येथे पहिली सभा झाली. या सभेआधी मोदींनी मराठीत ट्विट करुन याबाबत माहितीही दिली होती. विदर्भातील तब्बल दहा लोकसभेच्या उमेदवारांचा प्रचार आजच्या सभेतून केला जाणार होता. मात्र दहा खासदार एकत्र येऊन देखील जेवढी गर्दी जमायला हवी होती, ती गर्दी जमली नाही. त्यामुळे आता या सभेचे फोटो व्हायरल होत असून यामध्ये अर्धे मैदान रिकामे असल्याचे दिसत आहे. तसेच काही लोक मोदींचे भाषण सुरु असताना निघून जात असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

या सभेचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाल्यानंतर ट्विटरवर मात्र काही लोकांनी याला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. एका नेटीझन्सने म्हटले आहे की, बोरीवली स्टेशनला सकाळी ११ वाजता यापेक्षा जास्त गर्दी असते. तर पत्रकार अमेय तिरोडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, एवढी गर्दी तर साखर कारखान्याच्या निवडणुकीत होते.

- Advertisement -

वर्धा येथील आजच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत त्यांनी पवार  कुटुंबियांवर केलेल्या टिकेचा समाचार घेताना कदाचित या सभेतील कमी गर्दीमुळे त्यांचा आणि भाजपाचा माथा भडकला असावा, सभेला मिळालेला अल्प प्रतिसाद म्हणजे भाजपच्या पायाखालील वाळु घसरल्याचे लक्षण आहे. २०१४ साली दिलेल्या आश्‍वासनाची त्यांनी आठवण करावी, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या यांचा चढता आलेख पाहुन कुंभकर्ण कोण स्पष्ट होत आहे, असे मुंडे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्या कुटुंबियांची आणि राष्ट्रवादीची काळजी करू नये, काही दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी काय वक्तव्य केले होते? भाजपने स्वपक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या अवस्थेकडे लक्ष देण्याचा सल्ला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला आहे. पवार साहेब आणि महागठबंधन मोदी सरकार घालवल्याशिवाय राहणार नाही, हे भाजपच्या आणि मोदींच्या लक्षात आल्यामुळे त्यांच्या पोटात पोटशुळ उठल्याचा हल्ला त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -