Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाथाभाऊंनी फडणवीसांना केला होता फोन, भेटीतला 'तो' किस्सा आला समोर

नाथाभाऊंनी फडणवीसांना केला होता फोन, भेटीतला ‘तो’ किस्सा आला समोर

Related Story

- Advertisement -

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यावर असताना भाजपमधून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरच्या घरी भेट दिली. मात्र, त्यावेळी एकनाथ खडसे हे मुंबईला होते. त्यावेळी एकनाथ खडसे आणि फडणवीस यांच्यात फोनवर संभाषण झालं होतं, अशी माहिती समोर आली आहे. गेल्या काही काळातील एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांची संबंध सर्वांना ज्ञात आहेत. मात्र, एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांना जेवून जाण्यासाठी आग्रह केल्याचं समोर आलं आहे.

देवेंद्र फडणवीस जेव्हा एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर येथील घरी गेले, तेव्हा भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी फडणवीस आणि खडसेंचं बोलणं करुन दिलं. एकनाथ खडसे यांनी फोनवर बोलताना “मी मुंबईत आहे. आमच्या घरी आपलं स्वागत आहे. पण मी नसलो तरी जेवल्याशिवाय जाऊ नका,” असा आग्रह फडणवीसांना केला. त्यावेळी फडणवीसांनी “नुकसानाची पाहणी करण्यासाठी आपल्या भागात आलोय. माझे पुढचे कार्यक्रम नियोजित आहेत. मात्र, पुढच्यावेळी आलो की नक्की जेवण करेन,” असं सांगितलं. ही माहिती एकनाथ खडसे यांनी दिली. याव्यतिरिक्त आमच्यात काही बोलणं झालं नासल्याचं देखील खडसेंनी स्पष्ट केलं.

- Advertisement -

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकनाथ खडसे शरद पवार यांच्या घरी पोहचले. एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मागील काळात एकमेकांवर आरोप केले आहेत. त्यामुळे फडणवीस यांची खडसेंच्या घरी भेट आणि नाथाभाऊंची शरद पवार यांच्यासोबत भेट, यावरून तर्कवितर्क लावण्यात आले. यावर देखील खडसेंनी स्पष्टीकरण दिलं. फडणवीस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुक्ताईनगरला माझ्या घरी येणे आणि मी पवारांना भेटण्यासाठी जाणं हा योगायोग होता. पवार साहेबांची भेट ही नियोजित होती, असंही खडसे म्हणाले.

 

- Advertisement -

 

- Advertisement -