घरमहाराष्ट्रचूक मान्य केल्यावरही सत्तेसाठी संधी साधू शकतात; खडसेंचा फडणवीसांवर निशाणा

चूक मान्य केल्यावरही सत्तेसाठी संधी साधू शकतात; खडसेंचा फडणवीसांवर निशाणा

Subscribe

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत पहाटे घेतलेली शपथ ही चूक होती असं मान्य केलं आहे. यावरून भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी निशाणा साधला आहे. चूक मान्य केल्यावरही ते संधी साधू शकतात, असा टोला एकनाथ खडसे यांनी फडणवीसांना लगावला. तसंच सत्ता गेल्यापासून फडणवीस अस्वस्थ असून सत्ता स्थापन करण्यासाठी ते आजही तळमळत आहेत, असं खडसे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत अजित पवार यांच्यासोबत स्थान केलेलं सरकार ही चूक होती अशी कबुली दिली. यावरून एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांना चिमटा काढला. फडणवीस अस्वस्थ आहेत. कोणत्याही कारणाने सत्तेत आलं पाहिजे म्हणून त्यांनी अजितदादांसोबत सरकार स्थापन केलं. आता त्यांनी चूक मान्य केली आहे. पण चूक मान्य केल्यानंतरही अजूनही असा प्रसंग आला किंवा एखाद्या पक्षाने त्यांना ऑफर दिली तरी ते सत्ता स्थापन करतील, असा टोला त्यांनी लगावला.
भाजपमधील आमदारांमध्ये अस्वस्थता

- Advertisement -

भाजपधील आमदारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. नाराजांची संख्या वाढू नये म्हणून आपलं सरकार येणार असं आमदारांना सांगून वेळ मारून नेली जात आहे, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून हे सरकार पाडणार असल्याचं चंद्रकांत पाटील सांगत आहेत. फडणवीसांनीही तारीख निश्चित केली होती. पण काही होत नाही. हे सरकार दिवसेंदिवस मजबूत होत चाललं आहे. सरकार काही जात नाही. विरोधक वाट बघत आहेत. ते वाटच बघत राहतील, असा विश्वास खडसेंनी व्यक्त केला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -