बाबरी मशीद पाडली तेव्हा फडणवीस १३ वर्षांचे… जयंत पाटील यांची बोचरी टीका

मुंबईत सोमय्या ग्राऊंडवर झालेल्या भाजपच्या बुस्टर सभेत बाबरी पाडताना तिथे शिवसैनिक नव्हते असा गंभीर आरोप केला. तर आपण त्या ठिकाणी होतो असाही दावा त्यांनी केला. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून फडणवणीस यांच्यावर टिका केली जात आहे. तर आता जयंत पाटील यांनीही फडणवीस यांच्यावर उपरोधीक टिका केली आहे.

बाबरी मशीद पाडली तेव्हा आपण तिथे होतो, असा दावा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या दाव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनी समाचार घेतला आहे. बाबरी पाडली तेव्हा देवेंद्र फडणवीस अवघ्या १३ वर्षांचे होते. जर ते अयोध्येला गेले असतील तर लालकृष्ण अडवाणी यांच्यावर १३ वर्षांच्या बालकाचे प्राण धोक्यात घातले म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो. हे गंभीर प्रकरण आहे, अशी टिका जयंत पाटील यांनी सांगलीत पत्रकार परिषदेत केली.

मुंबईत सोमय्या ग्राऊंडवर झालेल्या भाजपच्या बुस्टर सभेत बाबरी पाडताना तिथे शिवसैनिक नव्हते असा गंभीर आरोप केला. तर आपण त्या ठिकाणी होतो असाही दावा त्यांनी केला. त्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांकडून फडणवणीस यांच्यावर टिका केली जात आहे. तर आता जयंत पाटील यांनीही फडणवीस यांच्यावर उपरोधीक टिका केली आहे. जयंत पाटील म्हणाले की, फडणवीस आणि माझी घट्ट मैत्री आहे. बाबरी मशीद पाडण्यासाठी ते गेले होते असे त्यांनी मला कधीही सांगितले नाही. त्यांना भेटल्यावर मी खासगीत विचारेन. त्यांनीही मला माहिती सांगावी. बाबरी पाडली तेव्हा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जबाबदारी घेतली होती. तशी जबाबदारी फडणवीस घेणार का असाही सवाल जयंट पाटील यांनी केला. जयंत पाटील यांनी यावेळी भोंग्यांच्या मुद्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावर टीका केली.  वाढलेल्या महागाईमुळे जनतेच्या मनात प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी दडवण्यासाठी राजकीय भोंगे वाजवले जात आहेत, असेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली आहे. दानवे यांनी एक फेसबुक पोस्ट टाकली असून यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचे एका आंदोलनातील जुने छायाचित्र दिसत आहे. या छायाचित्राला ‘लाठी चार्ज झाला की….… पळणारे म्हने बाबरी पाडायला गेला होता’, अशी कॅप्शन दानवे यांनी दिली आहे.