घरमहाराष्ट्रशिवसेना- वंचित युतीवर राष्ट्रवादी नाराज? जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

शिवसेना- वंचित युतीवर राष्ट्रवादी नाराज? जयंत पाटलांनी दिलं स्पष्टीकरण

Subscribe

आज राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक प्रदेश कार्यालय पार

मुंबई : शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर राष्ट्रवादी काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आले होते. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेना आणि वंचित युतीला आमचा विरोध नाही. कुणी आमच्या आघाडीबरोबर चर्चा करुन ऐनवेळी बाजूला जाऊ नये याची काळजी आघाडीतील प्रमुख घटकांनी घ्यावी अशी इच्छा आणि सतर्कता, असं स्पष्ट मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं आहे. (ncp leader jayant patil reaction shiv sena thackeray group and vanchit bahujan aghadi alliance)

आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत राज्यात सध्या जे प्रश्न सुरु आहेत त्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. यात बैठकीनंतर जयंत पाटलांनी वंचित – शिवसेना युतीवर माध्यमांसमोर भाष्य केलं.

- Advertisement -

यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उध्दव ठाकरे गट) यांनी कुणाशीही चर्चा केली आणि नवे मित्र जोडले तरी कुणाचा विरोध नाही परंतु मित्र जोडताना ते मित्र शेवटपर्यंत राहतील आणि निवडणूक आपल्याबरोबर लढवतील याची काळजी घेणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला आहे.

कसबा व चिंचवडबाबत महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष एकत्र बसतील व त्यावर निर्णय होईल. चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त असल्याने कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन चर्चा केली जाईल असे सांगतानाच वातावरण निर्माण करण्यासाठी मागण्या, घोषणा, ठराव करण्याचे कार्यक्रम सध्या भाजपकडून सुरू आहेत. सध्या विरोधकांवर दबावतंत्र वापरण्याचा प्रयत्न चिंचवडमध्ये भाजप करत आहे. मात्र खरी चौकशी तर पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची करायला हवी. त्याठिकाणी चौकशी केली तर भाजपचा किती भ्रष्टाचार आहे हे स्पष्ट होईल असेही जयंत पाटील म्हणाले.


एअर इंडियाला आता दहा लाखांचा दंड; विमान प्राधिकरणाला माहिती न दिल्याचा ठपका

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -