मोदी सरकारने कसे सहकारी निवडलेत हे राणेंच्या वक्तव्यावरुन दिसते, जयंत पाटलांकडून राणेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यावरून मुंबई, चिपळूण, नाशिकसह राज्यातील अनेक ठिकाणी राडा सुरु आहे. या राड्यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनीही उडी घेतली आहे. “मोदी सरकारने कसे सहकारी निवडलेत हे नारायण राणे यांच्या वक्तव्यावरुन दिसते” अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी भाजपावर केली आहे.

“राजकारणाचा स्तर खाली गेलेला नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेला”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नारायण राणे यांनी वापरलेल्या अपशब्दांवरुन जयंत पाटलांनी राणे यांच्यावर सडकून टीका केली आहे. “राजकारणाचा स्तर खाली गेलेला नाही तर काही लोकांचा स्तर खाली गेला आहे.” अशी बोचरी टीका जयंत पाटलांनी केली आहे.

“निषेध करणेच स्वाभाविक आहे’

”अशा पद्धतीने बोलणाऱ्या लोकांना महत्त्व देणं याचा राजकीय पक्षांनी विचार केला पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल भाजपाचा भले राग असेल, द्वेष असेल .. तरी ही भाषा महाराष्ट्र कधीही मान्य करणार नाही. दुर्दैवाने त्यांनी ही भाषा वापरील त्याबद्दल त्यांचा निषेध करणेच स्वाभाविक आहे.” अशा शब्दात जयंत पाटीलांनी राणेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केला.

“अशी भाषा राजकारणात यापूर्वी कधीही कुणी वापरली नव्हती”

“नारायण राणेंच वक्तव्य निषेधार्ह आहे. अशी भाषा राजकारणात यापूर्वी कधीही कुणी वापरली नव्हती, मोदी सरकराने कसे सहकारी निवडले आहेत याची छोटी चुनूक नारायण राणेंच्या वक्तव्यावरून महाराष्ट्राला आणि देशाला दिसले आहे.” असा टोलाही त्यांनी लगावला.

महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे निवडून आले तेव्हा त्यांनी संयमाने आणि जबाबदारीने वागण्याचे काम केले. पण अगदी टोकाची भूमिका जर कोण घेत असेल तर त्यावर शिवसैनिकांचीच नाही तर जनतेची रिअॅक्शन येत असते. अशा रिअॅक्शन जर येत असेल तर गृहखाते याची काळजी घेईल. कोणत्याही परिस्थितीत कायदा कोणी हातात घ्यावा याचं कोणी समर्थन करणार नाही, राष्ट्रवादी याचे समर्थ करणार नाही. पण राज्यातील मुख्यमंत्र्यांबद्दल अशी वक्तव्य करणाऱ्यांचा निषेध करावा तेवढा कमी आहे. असही जयंत पाटील म्हणाले.

चंद्रकांत दादांना जास्त मनावर घेत जाऊ नका, दोन वर्षे ते हेच सांगत आलेत. अशी टीकाही त्यांनी भाजपावर केली.


‘यापुढे अशी पोकळ आव्हान शिवसेनेला देऊ नका’; वरुण सरदेसाई यांचं नितेश राणेंना उत्तर