घरमहाराष्ट्रदुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्यांनी खुशाल तिकडे जाऊन राहावे, राज्यपालांच्या वक्तव्याचे जयंत पाटलांकडून...

दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्यांनी खुशाल तिकडे जाऊन राहावे, राज्यपालांच्या वक्तव्याचे जयंत पाटलांकडून निषेध

Subscribe

परराज्यातील व्यक्तींमुळे मुंबईत पैसा नसून या राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी आहे. दुसऱ्या राज्यांबद्दल प्रेम असणाऱ्या व्यक्तींनी खुशाल तिकडे जाऊन रहावे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वक्तव्यावर सुनावले आहे.

घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तींनी अत्यंत जपून बोलण्याचा संकेत या देशातील सार्वजनिक जीवनात आहे. मात्र, काही महामहिम व्यक्तींनी त्यांच्या दिल्लीतील बॉसना खुश करण्याचा चांगलाच चंग बांधलेला दिसत आहे असा टोलाही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये लगावला आहे.

- Advertisement -

महाराष्ट्राच्या राजधानीत पंचतारांकित व्यवस्थेत राहून महाराष्ट्रातील मराठी माणसांचा अपमान राज्यपाल महोदय करत आहेत. महाराष्ट्रातील भाजपाला हे विधान मान्य आहे का ? असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.  राज्यपाल मराठी माणूस, महाराष्ट्राचा गौरवशाली व जाज्वल्य इतिहास यांचा वारंवार का अपमान करत आहेत ? असा खडा सवालही जयंत पाटील यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी नेमक काय म्हणाले? 

मुंबई आणि ठाण्यातून गुजराती आणि राजस्थानी लोकं निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही. तसेच मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील एका स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. यावेळी त्यांनी हे विधान केले आहे.


हेही वाचा : मुंबईतून गुजराती, राजस्थानी गेल्यास ही आर्थिक राजधानी राहणार नाही; राज्यपालांचे वादग्रस्त विधान

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -