‘जो लड़ सका है वो ही तो महान है’, जितेंद्र आव्हाडांचे ‘ते’ ट्वीट चर्चेत

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याचा दावा केला होता. मात्र नेमकं त्यांना अटक कोणत्या गुन्ह्याखाली होणार असल्याचे अद्याप अस्पष्ट आहे. अशातच आता जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले असून, त्यांच्या या ट्वीटची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्याला कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याचा दावा केला होता. मात्र नेमकं त्यांना अटक कोणत्या गुन्ह्याखाली होणार असल्याचे अद्याप अस्पष्ट आहे. अशातच आता जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट केले असून, त्यांच्या या ट्वीटची सर्वत्र चर्चा रंगली आहे. तसेच, या ट्वीटचा अर्थ अनेक जण जितेंद्र आव्हाड यांनी दिलेल्या अटकेच्या संकेताशी जोडत आहेत. (NCP Leader Jitendra Awhad Aarambh Hai Prachand Song Tweet In Discussion Maharashtra Mumbai)

नेमके काय आहे आव्हाडांच्या ट्वीटमध्ये?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी “आरंभ है प्रचंड” या गाण्यातील एक कडवं ट्विटरवर शेअर केले आहे. तसेच, या ट्वीटला त्यांनी ‘गुड मॉर्निंग’ असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान, आव्हाडांनी शेअर केलेल्या गाण्याच्या या कडव्याच्या शेवटी ‘जो लड़ सका है वो ही तो महान है’ असे आहे. त्यामुळे आव्हाडांना या ट्वीटच्या माध्यमातून काही सांगायचं असल्याचे अनेकांकडून सांगितले जात आहे.

दरम्यान, जितेंद्र आव्हाडांनी नेमके हेचं गाणं ट्वीट करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र काही दिवसांपूर्वी कोणत्याही क्षणी अटक होणार असल्याचा दावा केला होता. कदाचीत त्यामुळेच त्यांनी हे ट्वीट केले असावं, अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

विशेष म्हणजे आव्हाडांच्या या ट्वीटनंतर एका नेटकऱ्याने ‘घाबरू नका. हिम्मत मजबूत ठेवा. पिंजऱ्यात गेलात तरी काही दिवसातच सरकारी रूग्णालयात जाता येते आणि मग तिथून ही लढा चालू ठेवता येतो’, अशी कमेंट केली आहे. तर, एका नेटकऱ्याने “एवढा बदल कसा काय , आव्हाड साहेब, कृष्ण की पुकार, भागवत का सार बापरे, जाऊद्या परत येताय हेच काय थोड आहे”, अशा शब्दांत टोला लगावला आहे.


हेही वाचा – नारायण राणे, किरीट सोमय्या हे भाजपाचे पोपटलाल; संजय राऊतांचा हल्लाबोल