घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात फक्त लुटालुट सुरुय; आव्हाडांचं मुख्यमंत्री शिंदेंवर टीकास्त्र

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात फक्त लुटालुट सुरुय; आव्हाडांचं मुख्यमंत्री शिंदेंवर टीकास्त्र

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात नुसती लुटालुट सुरु आहे. ठाण्यातील भ्रष्टाचाराला कोणी मायबापच उरला नाही, अशी स्थिती आज ठाण्याची असल्याचा, आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे

मागच्या काही दिवसांपूर्वी ठाण्यातील राजकारणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात सामना पाहायला मिळाला होता. जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्र्यांवर निधी वाटपाबाबत भेदभाव करत असल्याचा आरोप केला होता. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात नुसती लुटालुट सुरु आहे. ठाण्यातील भ्रष्टाचाराला कोणी मायबापच उरला नाही, अशी स्थिती आज ठाण्याची असल्याचा, आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ( NCP leader Jitendra Awhad criticised CM Eknath Shinde over Thane Corruption TMC )

नेमकं काय म्हणाले आव्हाड?

संपूर्ण ठाणे शहरात वीजेचा झगमगाट गेले 2-3 महिने दिसत होता. त्यावर महापालिकेने करोडो रुपये खर्च केले असल्याचे समजते. SMC नावाच्या कंपनीला ह्याचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. आज ठाण्यामध्ये 90 टक्के लाईट्स बंद पडलेल्या आहेत. या कामाची अजून बिले काढण्यात आली आहेत की नाही हे माहित नाही. पण महापालिकेच्या अधिकाऱ्यांना थोडीशी तरी लाज असेल तर निदान या कामांची बिले तरी थांबवा. फक्त लुटालूट चालू आहे. ठाणे शहरातील रस्त्यावरून फेरफटका मारा आणि तुम्ही मंजूर केलेल्या लाईट्स चालू आहेत की नाही ते बघा. लुटायचं तर किती लुटायचं, असा सवाल उपस्थित करत आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना लक्ष्य केलं आहे.

- Advertisement -

आयुक्त आपण याकडे लक्ष द्याल अशी अपेक्षा आहे. ठाण्यात असंख्य बेकायदेशीर बांधकामे चालू आहेत. करोडो रुपयांचे लाईट्स बंद पडलेल्या आहेत. नवीन तयार करण्यात आलेले रस्ते हे थोडासा पॅच मारून तयार करण्यात आले असून त्याची देखील लाखो रुपयांची बिले निघत आहेत. म्हणजे पैसे फक्त लुटण्यासाठीच असतात असं ठाणे महानगरपालिकेच्या आजच्या स्थितीवरून वाटत आहे. मायबापच नाही उरला अशी स्थिती आज ह्या मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात आहे, असा आरोप आव्हाडांनी केला आहे.

( हेही वाचा: खातेवाटपात राष्ट्रवादीला झुकते माप, पालकमंत्री पदासाठी सरकारमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता )

- Advertisement -

आव्हाडांनी केलेल्या या आरोपांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्यापासून, 17 जुलैपासून पावसाळी अधिवेशन सुरु होणार आहे. याचे काही पडसाद या अधिवेशनात उमटतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -