Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पवारांविरोधात केलेल्या 'त्या' वक्तव्याचा राष्ट्रवादीने घेतला समाचार; राज ठाकरेंवर पलटवार

पवारांविरोधात केलेल्या ‘त्या’ वक्तव्याचा राष्ट्रवादीने घेतला समाचार; राज ठाकरेंवर पलटवार

Subscribe

जितेंद्र आव्हाड यांनी स्मृतीभ्रंश यालाच म्हणतात असं म्हटलं आहे. तसंच त्यावर कोणतंही औषध नसल्याचं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

राज ठाकरे यांची शनिवारी, रत्नागिरी येथे सभा झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवरा या माणसाने कधीही शिवछत्रपतींच नाव घेतलं आहे का? असा सवाल ठाकरेंनी केला. आता यावर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ठाकरेंचा आधीचा शरद पवार यांच्यासोबतचा एक व्हिडीओ ट्वीट करत, राज ठाकरेंना स्मृतीभ्रंश झाल्याचं म्हटलं आहे. ( NCP leader Jitendra Awhad criticised MNS President Raj Thackeray over Sharad pawars statement on Chhatrapti Shivaji Maharaj )

आव्हाडांच ट्वीट काय?

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांचे दोन व्हिडीओ ट्वीट केले आहेत. एका व्हिडीओमध्ये राज ठाकरे काल, शनिवारी झालेल्या सभेत शरद पवार यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव घेतलं नसल्याचं म्हटलं आहे.

- Advertisement -

तर दुसऱ्या व्हिडीओत राज ठाकरे यांनी जेव्हा ‘शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमात शरद पवार यांची मुलाखत घेतली होती तेव्हा प्रत्येक राज्यात वेगवेगळे हुक्स असतात ज्यांच्या नावाखाली त्या त्या राज्यातील लोक एकत्र येतात, तसं महाराष्ट्रात कोणतं हुक आहे, असं तुम्हाला वाटतं, त्यावर शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज, असं उत्तर दिलं होतं.

हे दोन्ही व्हिडीओ ट्वीट करत जितेंद्र आव्हाड यांनी स्मृतीभ्रंश यालाच म्हणतात असं म्हटलं आहे. तसंच त्यावर कोणतंही औषध नसल्याचं म्हणत त्यांनी राज ठाकरेंवर टीका केली आहे.

- Advertisement -

( हेही वाचा: उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा राऊतांचा डाव; नितेश राणेंचा घणाघात )

काय म्हणाले होते राज ठाकरे?

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा मुद्दा काढण्यात आला. मात्र मी नेमकं काय बोललो ते बाजूला ठेऊन माझा स्मारकाला विरोध असल्याचं पसरवलं. पण, खरंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवरा या माणसाने कधीही शिवछत्रपतींचं नाव घेतलं आहे का?

राज ठाकरेंनी अजित पवार यांच्या केलेल्या मीमीक्रिला राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मिटकरी यांनी ट्वीट करत म्हटलं की, रिकाम्या खुर्चीच्या सरदाराने भाजपची सुपारी घेऊन आज अजित पवारांची मिमिक्री केली म्हणे. अमावस्या पौर्णिमेला उगवणाऱ्या लिटिल स्टारनी सुर्याच्या नादाला लागून आपलं हसं करुन घेऊ नये, आमच्या नेत्याने एक मिनिटं म्हटलं तरी पळा भुई थोडी होईल, अशी टीका मिटकरी यांनी केली आहे. ( Amol Mitkari)

 

- Advertisment -