‘EVM हा घोटाळाच आहे…’ कर्नाटकातील भाजपाच्या पराभवावर आव्हाडांची प्रतिक्रिया

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा बहुमताने विजय झाला. काँग्रेसने कर्नाटकातील 135 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे सत्तेवर असलेल्या भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयानंतर काँग्रेसच्या नेतेमंडळींकडून देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान, भाजपाच्या या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसेचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे.

कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा बहुमताने विजय झाला. काँग्रेसने कर्नाटकातील 135 जागांवर विजय मिळवला. त्यामुळे सत्तेवर असलेल्या भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. या विजयानंतर काँग्रेसच्या नेतेमंडळींकडून देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. दरम्यान, भाजपाच्या या पराभवावर राष्ट्रवादी काँग्रेसेचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे. भाजपाला तीन प्रमुख राज्य ताब्यात ठेवायची आहेत. गुजरात, उत्तर प्रदेश आणि लोकसभा याच तीन राज्यांमध्ये EVM चा घोटाळा होतो”, असा टोला आव्हाडांनी लगावला.

ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी भाजपाला टोला लगावला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी EVM घोटाळ्याबाबत भाष्य केले आहे. (NCP Leader Jitendra Awhad Slams BJP After loss Karnataka Elections)

नेमके काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?

“EVM हे अतिशय दुर्तपणे वापरले जाणारे हत्यार आहे. ते राज्यांच्या निवडणुका जिंकून देतात. हे दाखवून देण्यासाठी की EVM मध्ये काही घोटाळा नसतो, त्यांनी तीन प्रमुख राज्य स्वताच्या ताब्यात ठेवायची आहेत, गुजरात, उत्तरप्रदेश आणि लोकसभा EVM चा घोटाळा फक्त या तिघांमध्ये होतो. बाकीच्या ठिकाणी ते म्हणतात, राज्य गेलं तर गेलं. आणि ते विश्वास देतात लोकांना की, EVM मध्ये काहीच नाही. खरं तर EVM मध्येच सर्वकाही आहे. त्यामुळे इतकी राज्य जिंकूनसुद्धा लोकसभेत काहीच होत नाही”, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.


हेही वाचा – जम्मू-काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा; भारतीय लष्कराची मोठी कारवाई