घरमहाराष्ट्रजामीन मंजूर झाल्यानंतर आव्हाडांनी थेट मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा, म्हणाले...

जामीन मंजूर झाल्यानंतर आव्हाडांनी थेट मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा, म्हणाले…

Subscribe

ठाणे : एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आव्हाड यांच्यावर झालेली कारवाई कायदेशीर असल्याचे वक्तव्य केले असताना, मात्र दुसरीकडे जामीन मंजूर झाल्यावर जितेंद्र आव्हाड यांनी केवळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबत दाखविण्यात आलेल्या चुकीच्या विकृतीला विरोध केला, म्हणूनच आमच्यावर कायद्याचा कोणत्याही प्रकारचा आधार न घेता, चुकीचे कलम लावून महाराष्ट्राला दाखविण्यासाठी आम्ही कायदा कसाही मोडतोड करु शकतो, फेकू शकतो हे उदाहरण सेट करण्यासाठीच ही अटक करण्यात आल्याचा आरोप करत, थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

तसेच शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे विकृतीकरण होत असेल तर त्याला आम्ही विरोध करणार आणि त्यासाठी आम्हाला ३६५ दिवस जरी जेल मध्ये टाकले तरी त्याचे आम्ही स्वागत करुच असे म्हणत, तुम्ही जेल काय फाशी दिली तरी चालेल असेही त्यांनी शनिवारी जामीन मंजूर झाल्यावर घेतल्या पत्रकार परिषदेत बोलून मुख्यमंत्र्यांना आव्हान जणू दिले.
गुरुवारी रात्री विवियाना मॉल मधील हरहर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडताना, त्या वेळेस झालेल्या मारहाण प्रकरणी आव्हाड यांना कलम ४१ (ए) अन्वये पहिली नोटीस आल्यानंतर सांयकाळी ५ वाजेपर्यंत चौकशीला हजर राहावे असे सांगण्यात आले होते. मात्र दोन वाजता नोटीस दिल्यानंतर अडीच वाजता अटक करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

वास्तविक पाहता, अटक करण्यापूर्वी नियमानुसार ७२ तासाची संधी देणो अपेक्षित होते. त्यावेळेस माझे म्हणणे मांडता आले असते, मात्र तसे न करता केवळ दबावापोटी अटक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. त्यात शुक्रवारी अटक झाल्यानंतर कोर्टात हजर करता आले असते मात्र सांयकाळपर्यंत वेळ काढण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. केवळ जेलमध्ये कसे ठेवता येईल याची तजवीज करण्यात आली होती, असेही त्यांनी सांगितले. इतिहासाचे विकृतीकरण होऊ नये यासाठी आम्ही हा विरोध केला होता, आणि विरोध करत राहू असेही त्यांनी सांगितले. दरम्यान पुढे बोलताना, याला राज ठाकरे यांनी विरोध करायला हवा होता ज्यांचा या चित्रपटात आवाज आहे, त्यांना स्क्रीप्ट माहित नसेल का? त्यांचे हृदय दुखावले नसले का? त्यात एवढे विकृतीकरण होत असतांना राज ठाकरे याच्यावर काहीच बोलत का नाही? असा सवाल त्यांनी केला.

ते खुप हुशार आहेत, त्यामुळे त्यांनी अशा चित्रपटांना थांबविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तुम्ही माफी मागावी, तुमचा चित्रपटातील आवाज मागे घ्यावा, असे मी त्यांना सांगणार नसल्याचे जाहीर केले. तर माराहाणीची तक्रार झाली, मात्र ज्याला मारहाण झाली, त्या तक्रारदाराने या प्रकरणात आव्हाड यांचा काही संबध नसल्याचे सांगितले. तर मॉल चालकाने देखील कुठेही तक्रार केलेली नाही. परंतु मला कसे अडकावयचे यासाठीच प्रयत्न झाल्याचे दिसून आल्याचेही त्यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.


आम्ही काहीही करू शकतो हे दाखवण्यासाठी मला अटक; जामीनानंतर आव्हाडांची पहिली प्रतिक्रिया

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -