न्यायालयीन लढाईत राज्यघटनेचाच विजय होईल; राष्ट्रवादीचा विश्वास

बुधवारी होणाऱ्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय शिवसेनेतील बंडखोरी, राज्यातील सत्तांतर आणि विधानसभेतील बदलांची कायदेशीर वैधता यावर सुनावणी घेणार आहे

shinde - fadanvis

मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे आमदार एकनाथ शिंदे यांच्यासह ४० हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे राजकारणात भूकंप आला. हे बंडखोरीचे प्रकरणात आता सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. यासंदर्भातील दाखल याचिकांवर आता 20 जुलै रोजी सुनावणी पार पडणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखालील तीनसदस्यीय पीठासमोर या याचिकांवर सुनावणी पार पडणार आहे, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आता राज्यातील शिंदे सरकारचे भवितव्य अवलंबून आहे. दरम्यान राज्यातील राजकीय घडामोडी आता घटनापीठासमोर सुनावणीला सुरुवात होणार या लढाईत राज्यघटनेचाच विजय होईल असा विश्वास आता राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी व्यक्त केला आहे.

घटनापीठासमोर जे काही दावे प्रतिदावे या राजकीय घडामोडीवर होतील त्यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे त्यामुळे सर्वात शेवटी भारतीय राज्यघटनेचाच विजय होईल असा आमचा विश्वास आहे असेही महेश तपासे यांनी स्पष्ट केले आहे. या न्यायलयातील सुनावणीमुळे न्यायालयातील सुनावणीमुळे 20 तारखेचा मंत्रिमंडळ विस्तार पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे.

बुधवारी होणाऱ्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालय शिवसेनेतील बंडखोरी, राज्यातील सत्तांतर आणि विधानसभेतील बदलांची कायदेशीर वैधता यावर सुनावणी घेणार आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या तीन सदस्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल.


श्रीलंकेत महागाईच्या झळा तीव्र. ‘या’ जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला!