घरताज्या घडामोडीसांगलीत पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या, ४ दिवसांत दुसरी घटना!

सांगलीत पुन्हा राष्ट्रवादीच्या नेत्याची हत्या, ४ दिवसांत दुसरी घटना!

Subscribe

गेल्या चार दिवसांपासून सांगलीतील वातावरण तणावग्रस्त आणि चिंताग्रस्त झालं आहे. कारण गेल्या ४ दिवसांमध्ये सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी सांगलीच्या कवठे-महांकाळ तालुक्यातल्या देशिंग गावात हा हल्ला झाला. मनोहर पाटील असं हत्या करण्यात आलेल्या नेत्याचं नाव असून ते पंचायत समितीचे माजी सभापती होते. या हत्येचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र, या दोन हत्यांमुळे सांगलीमध्ये खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या दोन्ही हत्या प्रकरणांचा तपास सुरू असून या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती देखील पोलिसांकडून देण्यात आली आहे.

चारच दिवसांपूर्वी झाली होती हत्या

अवघ्या चारच दिवसांपूर्वी सांगलीमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंदराव पाटील यांची अशाच पद्धतीने अज्ञात हल्लेखोरांकडून हत्या करण्यात आली होती. पाटील यांच्या डोक्यावर वार करून हल्लेखोर पसार झाले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा तशीच घटना समोर आली आहे.

- Advertisement -

पूर्ववैमनस्यातून हत्या?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंचायत समितीचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील एक ज्येष्ठ नेते मनोहर पाटील संध्याकाळच्या सुमारास त्यांच्या शेतात काही कामानिमित्त गेले होते. त्याचवेळी परिस्थितीचा फायदा उचलत हल्लेखोरांना मनोहर पाटील यांना एकट्याला गाठलं आणि त्यांच्यावर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले. या हल्ल्यामध्ये मनोहर पाटील गंभीर जखमी झालेले पाहाताच याहीवेळी हल्लेखोरांनी पळ काढला. जखमी पाटील यांना आसपासच्या ग्रामस्थांनी तातडीने मिरजमधल्या रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झढाला होता. या प्रकरणात कवठे-महांकाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातूनच ही हत्या झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -