घरताज्या घडामोडीत्यांच्या बापजाद्याने 50 खोके पाहिले नसतील; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर खडसेंचा हल्लाबोल

त्यांच्या बापजाद्याने 50 खोके पाहिले नसतील; शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर खडसेंचा हल्लाबोल

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या तब्बल 40 आमदारांसह केलेल्या बंडखोरीमुळे महाराष्ट्रात सत्तापालट झाला. महाविकास आघाडी सरकार कोसळून शिंदे – फडणवणीस यांच्या नेतृत्त्वाने नवे सरकार स्थापन झाले. मात्र सरकार स्थापनेसाठी पाठींबा देणाऱ्या बंडखोर आमदारांवर सातत्याने टीकेची झोड उठवली जात आहे.

बंडखोरीसाठी या आमदारांना प्रत्येकी 50 कोटी रुपये दिल्याचा दावा आता महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांकडून करण्यात आला आहे. याचसंदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी बंडखोरांवर टीकास्त्र डागले आहे. बंडखोर आमदारांच्या बापजाद्याने 50 खोके पाहिले नसतील अशा शब्दात खडसेंनी हल्लाबोल केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : मुख्यमंत्री नांदेड, हिंगोली दौऱ्यावर; पूरग्रस्त हिंगोलीकरांची मदतीची अपेक्षा

जळगावातील मुक्ताईनगरमध्ये रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात बोलताना खडसेंनी नव्या शिंदे समर्थक आमदारांवर टीकेची तोफ डागली. यांच्या बापजाद्याने कधी 50 खोके पाहिले नसतील, तुम्हाला काय हाटील, काय झाडी जे काही बघायचे असेल ते बघा. मात्र जनतेला वाऱ्यावर सोडू नका. अशा शब्दात एकनाथ खडसेंनी सरकारकडून लोकशाहीची मस्करी केली जात असल्याचा आरोप केला आहे.

राज्यात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन होऊन महिना उलटून गेला. मात्र त्यानंतरही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, यावर बोलताना खडसे म्हणाले की, एक मुख्यमंत्री तर दुसऱ्या बिनखात्याचा उपमुख्यमंत्री आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून गेल्या 37 दिवसांपासून सरकारचा पोरखेळ सुरु आहे. अशा शब्दात त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : काही अपमान करण्याचा उद्देश नाही, मुख्यमंत्र्यांना तिसऱ्या रांगेत उभे करण्यावरून भाजप-राष्ट्रवादीत जुंपली

एकनाथ खडसेंच्या या टीकेवर आता शिंदे गटातील आमदार आणि भाजपकडून काय प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दरम्यान शिंदे – फडणवीस सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तारासाठी तारीख पे तारीख दिली जातेय. ज्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी देखील टीका केली आहे. शिंदे – फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार लवकरंच – लवकरचं होई असं सांगतायत, असं अजित पवार म्हणाले. तर आज मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी देखील लांबलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.


बंड झाले, आता थंड झाले? मनसेच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -