Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी कोकणात रिफायनरी आणायची; नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप

ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी कोकणात रिफायनरी आणायची; नाना पटोलेंचा शिंदे-फडणवीसांवर गंभीर आरोप

Subscribe

छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील वज्रमूठ सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाविकास आघाडीची मुंबईत आज तिसरी वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेत भाष्य करताना नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

‘ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी यांना कोकणात रिफायनरी आणायची आहे’, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केला. तसेच, ‘विकासाच्या नावाने कोकण उद्धवस्त करण्याचे कारस्थान रचले जात आहेत’, असेही नाना पटोले म्हणाले. (NCP Leader Nana Patole Slams Shinde Fadnavis Government In Vajramuth Meet BKC Mumbai)

छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील वज्रमूठ सभेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर आता महाविकास आघाडीची मुंबईत आज तिसरी वज्रमूठ सभा पार पडत आहे. या सभेत भाष्य करताना नाना पटोले यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला.

- Advertisement -

नेमकं काय म्हणाले नाना पटोले?

“आज कामगार दिवस आहे. कामगारांच्या मेहनतीला नमन करण्याचा दिवस आहे. वज्रमूठ सभा जेव्हाजेव्हा येते तेव्हा शिंदे-फडणवीसांच्या मनात भीती निर्माण होते. भाजप हे शतेकरी, गरीब आणि मध्यमवर्गाच्या विरोधातील पक्ष आहे. काल परवा आलेला बाजार समितीचा निकाल त्याचमुळे सत्ताधाऱ्यांच्याविरोधात आला. या निमित्ताने जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली आहे”, असे नाना पटोले म्हणाले.

- Advertisement -

“महापालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका रोखून धरण्यात आल्या आहेत. हे लोकशाहीला संपवण्याची प्रक्रिया आहे. या निवडणुका झाल्या तर शिंदे गट आणि भाजपचा पराभव नक्की आहे, त्याच भीतीने ते निवडणुका घेण्याचे टाळत आहेत”, असे नाना पटोले म्हणाले.

“केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, आणि राज्य सरकारने खारघरमध्ये सामूहिक हत्याकांड केले आहे. त्यासाठी आम्ही विधानसभेचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. मात्र हे सरकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यावर दोषारोप करत आहेत. लोक उन्हात तडफडून मरत होते, तरीही यांनी खारघरमधील कार्यक्रम सुरु ठेवला. गृहखातं फडणवीसांकडे आहे. त्यांना सर्व माहित होतं मात्र ते मेजवाण्या घेत होते. आणि तिकडे लोक तडफडून मरत होते. इंग्रजांनाही लाजवेल असे पाप भाजपचे लोक करत आहेत”, असे नाना पटोले म्हणाले.

“रत्नागिरीतील बारसूमध्ये रिफायनरीचा वाद सुरु आहे. कोकणातील पर्यावरणाला यामुळे बाधा होणार आहे. कोकणातील पर्यावरण हे प्रत्येकाला रिचार्ज करणारं आहे. विकासाच्या नावाने कोकण उद्धवस्त करण्याचे कारस्थान रचले जात आहेत. ब्लॅक मनी व्हाईट करण्यासाठी यांना कोकणात रिफायनरी आणायची आहे. त्यासाठी महिलांवर लाठीचार्ज करण्यात आला”, असे नाना पटोले म्हणाले.

“हे सरकार आल्यापासून राज्यात अवकाळी पाऊस सुरु झाला आहे. गारपिट सुरु झाली आहे. त्या शेतकऱ्यांना हे सरकार मदत करायला तयार नाही. ७५ नोकऱ्या देण्याचे पोकळ आश्वासन शिंदे-फडणवीस सरकार देत आहे. हे ७५ हजार लोक आऊट सोर्सिंगच्या माध्यमातून भरले जाणार आहे. त्याचे आऊट सोर्सिंग हे भाजपच्या बगलबच्च्यांना दिले जाणार आहे. त्यासाठी जनतेच्या घामाचा पैसा वापरला जाणार आहे”, असे नाना पटोले म्हणाले.

“मन की बातसाठी देशभर इव्हेंट करण्यात आली. जिथे जिथे भाजपचे सरकार आहे तिथे मोठमोठे इव्हेंट करण्यात आले. जनतेच्या पैशांची ही लयलूट या सरकारने चालवली आहे. लोकशाही संपवण्यासाठी या सरकारचा अटापिटा सुरु आहे. काँग्रेस ही महाविकास आघाडीबरोबर आहे. देशात आणि राज्यात असलेल्या तानाशाही सरकारला बाहेर खेचल्याशिवाय आम्ही राहाणार नाही”, असे नाना पटोले म्हणाले.

- Advertisment -