घरताज्या घडामोडीट्विटरच्या कार्यालयांवर छापा टाकून केंद्र सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीचा आरोप

ट्विटरच्या कार्यालयांवर छापा टाकून केंद्र सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न, राष्ट्रवादीचा आरोप

Subscribe

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभुत अधिकार असून त्याला आळा घालता येणार नाही

भाजप नेते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर टुलकिट टॅग बनवल्याचा आरोप केला आहे. याविरोधात दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाच्या कार्यालयामध्ये छापा टाकला आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळातून केंद्र सरकारवर आरोप करण्यात येत आहेत. राष्ट्रवादी नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनीही केंद्र सरकार आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. दिल्ली पोलिसांनी टुलकिट प्रकरणात ट्विटर इंडियाला नोटीस बजावली यानंतर छापा टाकला होता. काँग्रेसने केंद्र सरकार आणि मोदी यांची बदनामी करण्यासाठी ट्विटरवर टुलकिट टॅग बनविल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला होता.

भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी काँग्रेसवर आरोप केला होता याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून टीका करण्यात आली होती. कोरोना काळात आलेल्या अपयशाला झाकण्यासाठी मोदी सरकारचा केविलवाणा प्रयत्नातून आरोप करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. देशातील करोडो भारतीयांना आपले विचार माडण्यास आणि विचार व्यक्त करण्याचे ट्विटर हे माध्यम आहे. परंतु ट्विटरच्या कार्यालयांवर छापा टाकून केंद्र सरकार आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. हे कृत्य निंदनीय असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे. बोलणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मूलभुत अधिकार असून त्याला आळा घालता येणार नाही असेही राष्ट्रावादी नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

काँग्रेसकडून हल्लाबोल

काँग्रेसचे नेते रणदीप सुरजेवाला यांनीही या कारवाईविरोधात केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्ली पोलिसांनी ट्विटरवर केलेल्या भ्याड कारवाईमुळे टुलकिट प्रकरणातील फसवणूक लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न उघडकीस आला आहे. वक्तृत्वाच्या स्वातंत्र्याची हत्या करण्याच्या अशा प्रयत्नांमुळे भाजप दोषी ठरत असल्याचे रणदीप सुरजेवाला यांनी म्हटले आहे.

दिल्ली पोलिसांची ट्रविटर इंडियाला नोटीस

भाजप नेते संबित पात्रा यांनी काँग्रेस भाजपला बदनाम करण्यासाठी ट्विटरवर टुलकिट टॅग बनवले असल्याचे आरोप केला आहे. याबाबत दिल्ली पोलिसांनी ट्विटर इंडियाच्या कार्यालयात जाऊन नोटीस दिली यानंतर पोलिसांनी कार्यालयावर जाऊन छापा टाकला आणि तपासणी केली असल्याचे बोलले जात आहे. ट्विटरला नोटीस धाडून जबाब देण्यास सांगितले आहे. परंतु अद्याप ट्विटरकडून अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -