घरताज्या घडामोडीगुजरातच्या भाजप कार्यालयामध्ये रेमडेसिवीरचा मोठा साठा - नवाब मलिक

गुजरातच्या भाजप कार्यालयामध्ये रेमडेसिवीरचा मोठा साठा – नवाब मलिक

Subscribe

एकाबाजूला राज्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. तर दुसऱ्या बाजूला कोरोना थोपविण्यासाठी आवश्यक असणारी कोरोना लस, रेमडेसिवीर, आरटीपीसीआर चाचण्याचे कीट यांच्यात तुटवडा जाणवत आहे. तसेच यादरम्यान रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचे समोर आले आहे. शिवाय कोरोना लसीचा पुरवठा महाराष्ट्रापेक्षा गुजरात जास्त होत असल्याचा आरोप केंद्र सरकारवर करण्यात आला आहे. असे असताना रेमडेसिवीरच्या पुरवठ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मोठा आरोप केला आहे. गुजरातच्या भाजप कार्यालयामध्ये रेमडेसिवीरचा मोठा साठा असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे.

नक्की काय म्हणाले नवाब मलिक?

‘देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना, महाराष्ट्रामध्ये जवळपास ५५ हजारांहून अधिक रुग्ण दिवसाला आढळत आहेत. देशामध्ये रेमडेसिवीरचा साठ्याचा तुटवडा जाणवत आहे, तीच परिस्थिती गुजरातमध्ये देखील आहे. याच दरम्यान गुजरातमधील सुरतच्या भाजप कार्यालयातून रेमडेसिवीरचे मोफत वाटप सुरू आहे. यासंदर्भात जाहिरात देण्यात आली. स्वतः भाजपचे नेते याबाबत टिव्हीवर बाईट देताना दिसले. या देशात नक्की चालंय काय? यंत्रणेच्या माध्यमातून साठा, पुरवठा झाला पाहिजे. तसेच कुठेतरी वाटप झाले पाहिजे. पण आता एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयातून हे होत आहे. मात्र कुठून आले इतके रेमडेसिवीर? चोरून आणली काय? किंवा आमच्या माध्यमातून औषधाचं वाटप होईल असा कंपनीवर दबाव टाकला काय?’, असा सवाल नवाब मलिक यांनी केला.

- Advertisement -

तसेच पुढे नवाब मलिक म्हणाले की, ‘नितीन गडकरी यांनी सांगितल्यावर नागपूरला काल १० हजार रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात आला. मग महाराष्ट्राला असं का भेटत नाही? त्यामुळे आता औषधांच्या माध्यमातून राजकारण सुरू झालं आहे, असं वाटत असून हे योग्य नाही आहे.’


हेही वाचा – Corona Vaccination: भारताने कोरोना लसीकरणात अमेरिका, चीनला टाकले मागे

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -