घरमहाराष्ट्रभाजप शेतमालाची लूट करणारा पक्ष, मोदी मुद्द्यावर या - राष्ट्रवादीची टीका

भाजप शेतमालाची लूट करणारा पक्ष, मोदी मुद्द्यावर या – राष्ट्रवादीची टीका

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वर्धा येथे राज्यातील पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी पहिली सभा घेतली. यावेळी त्यांनी शरद पवार आणि पवार कुटुंबियांवर टीका केली होती. या टीकेला आता राष्ट्रवादीकडून प्रत्युत्तर देण्यात येत आहे.

वर्धा येथील सभेत रिकाम्या खुर्च्या बघून मोदींचा रागाचा पारा चढला आणि त्यांनी पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असे मोदी विचारत आहेत. परंतु पवारांनी देशात आणि राज्यात शेतकऱ्यांसाठी काय केले आहे, हे जगजाहीर आहे. “भाजप हा शेतमालाचे उत्पादन करणारा नाही, तर शेतमालाची लुट करणारा पक्ष आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ते पाच वर्षात न्याय देऊ शकले नाहीत आणि आता सिंचन घोटाळ्यामुळे आत्महत्या होत आहेत. पाच वर्षात कुठले आरोप सिद्ध केले? कुठले प्रकल्प पूर्ण केले? याचे उत्तर भाजप देत नाही, असेही नवाब मलिक म्हणाले.

हे वाचा – मोदींच्या सभेपेक्षा बोरीवली स्टेशनला जास्त गर्दी; मोदींची सभा सोशल मीडियावर ट्रोल

“शरद पवार आणि अजित पवार यांच्यात गटबाजी आहे. अजित पवार पक्षात कुठे तरी अस्तित्व निर्माण करत आहेत, असे तुम्ही बोलत आहात. अहो आमची वडीलधारी आणि वयस्कर लोकांना मान देण्याची परंपरा आहे. पवार साहेब तर आमचे अध्यक्ष आहेत. त्यांचा आदर आमचा कार्यकर्ता ठेवतो. परंतु तुमचे नेते अडवाणींनी तुम्हाला राजकारणात आणले, तुम्हाला मुख्यमंत्री केले. मात्र त्यांची हालत तुम्ही काय केली? हे देश बघतोय, असा टोलाही मोदी यांनी लगावला.

- Advertisement -

जनताच भाजपची विकेट घेणार

आमची विकेट जाणार असे मोदी म्हणाले. परंतु सभेचे मैदान रिकामे होते, याचा अर्थ जनताच तुमची विकेट घेणार आहे. इतरांकडे बोटे दाखवण्यापेक्षा आजच्या सभेचा राग तुम्हाला आला. त्यातूनच तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि अध्यक्ष शरद पवार यांच्यावर काढला आहे. परंतु तुम्ही कितीही राग काढला तरी जनताच २३ मे रोजी तुमची विकेट घेणार आहे, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला.

मोदीजी मुद्द्यावर या – जितेंद्र आव्हाड

तर दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांनी देखील ट्विट करुन भाजपवर टीका केली आहे. ‘वर्ध्यात महात्मा गांधीचे वास्तव्य होते. तिथून ते दिल्लीला गेले आणि नथुराम गोडसेने त्यांची हत्या केली. आज त्याच वर्ध्यात पंतप्रधानांची सभा झाली. मोदींनी आज जे भाषण केले ते पंतप्रधानांना शोभणारे नव्हते. बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी यावर मोदीजी बोलायला तयार नाहीत. पाच वर्षापूर्वी जी जुमलेबाजी मोदी करत होते, तीच आज करत आहेत, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे.

- Advertisement -

मोदी यांनी पवार आणि कुटुंबियांवर टीका केली याचाही समाचार आव्हाड यांनी घेतला. पवार जेव्हा मुख्यमंत्री पद सोडून दिल्लीत गेले होते. तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री झाला होतात. ज्या अडवाणींनी तुम्हाला राजकारणात आणले त्यांना तुम्ही माशी सारखे उचलून बाजुला केले. त्यामुळे मोदी तुम्ही मुद्द्याचे बोला, असे आव्हानच आव्हाड यांनी दिले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -