घरताज्या घडामोडीभाजप युती करुन खच्चीकरण करतो हे शिवसेनेला कळल होतं, नवाब मलिकांचे वक्तव्य

भाजप युती करुन खच्चीकरण करतो हे शिवसेनेला कळल होतं, नवाब मलिकांचे वक्तव्य

Subscribe

शिवसेनेसोबत असताना भाजप मोठी झाली हे आता देवेंद्र फडणवीस यांना समजले आहे परंतु आठ वर्षापासून देवेंद्र फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

दिल्लीच्या सहकार्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना संपवण्याचे राजकारण केले मात्र आता त्यांना शिवसेना काय आहे हे समजू लागल्याने अशा प्रकारची विधाने ते करत असल्याचा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर रविवारी हल्लाबोल केला. यावर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही भाजपवर घणाघात केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला चांगलाच टोला लगावला आहे. नवाब मलिक म्हणाले की, पाच वर्षाचा निकाल पाहिला तर भाजपमुळे शिवसेनेचे खच्चीकरण झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी २५ वर्ष युतीत सडलो असे विधान केले आहे. मात्र आता शिवसेनेची ताकद वाढताना दिसत आहे. आता जे नगरपालिकांचे निकाल आले त्यावरुन भाजपसोबत राहिल्याने कमकुवत झालेल्या शिवसेनेचा ग्राफ कितीतरी पटीने वाढलेला दिसला असेही नवाब मलिक म्हणाले.

- Advertisement -

बाळासाहेबांनी युतीतून बाहेर पडण्याचा विचार केला होता

बाळासाहेबांनी युतीचा निर्णय घेतला होता शिवाय हयातीत युतीतून बाहेर पडण्याचा विचारही केला होता. आम्ही कॉंग्रेससोबत असताना सेनेकडून राष्ट्रवादी सोबत आली पाहिजे हा प्रस्ताव होता परंतु काही कारणामुळे जमले नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले. २०१९ च्या आधीपासून भाजपसोबत खच्चीकरण होतेय ही चर्चा सुरू होती. भाजप ज्या पक्षांसोबत युती करतो त्यांचे खच्चीकरण करतो हे सेनेला अगोदरच कळले होते त्यामुळे सेनेने भूमिका घेऊन भाजपला बाजूला केले असेही नवाब मलिक म्हणाले. सेनेसोबत असताना भाजप मोठी झाली हे आता देवेंद्र फडणवीस यांना समजले आहे परंतु आठ वर्षापासून देवेंद्र फडणवीस सेनेला संपवण्याचे राजकारण करत होते असा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला.

शरद पवारांना कोरोनाची लागण

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ते होम क्वारंटाईन आहेत त्यांची प्रकृती बरी आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. डॉक्टरांच्या सल्ल्याने शरद पवार उपचार घेत आहेत. गेल्या २ – ३ दिवसात पवारांच्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची कोविड टेस्ट करावी, असे आवाहन स्वतः पवारसाहेबांनी केले आहे असेही नवाब मलिक म्हणाले. पुढील ७ दिवसाचे पवारसाहेबांचे जे कार्यक्रम होते ते रद्द करण्यात आले आहेत. पवारांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर पुन्हा नियोजित कार्यक्रम होतील असेही नवाब मलिक यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा : शिवसेनेचा पहिला नगरसेवक, आमदार फडणवीसांच्या जन्माच्या आधीचे – संजय राऊत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -