घरक्राइमनवाब मलिकांनंतर त्यांच्या मुलाच्या अडचणीत वाढ; बनावट व्हिसाप्रकरणी गुन्हा दाखल

नवाब मलिकांनंतर त्यांच्या मुलाच्या अडचणीत वाढ; बनावट व्हिसाप्रकरणी गुन्हा दाखल

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसे नेते नवाब मलिक यांच्यानंतर त्यांचा मुलगा फराज मलिक अडचणीत सापडला आहे. फराज मलिक आणि त्याच्या फ्रेंच मैत्रिणीविरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बनावट व्हिसाप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप नेते मोहित कंबोज यांनी यासंबंधीत ट्विट करत माहिती दिली आहे.


सध्या राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआय आणि ईडीच्या जाळ्यात अडकले आहेत. अशातच त्यांचा मुलगा फराज मलिक विरोधात कुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बनावट कागदपत्र तयार केल्याच्या आरोपाखाली हा गुन्हा दाखल झाला आहे. फराज मलिक यांनी व्हिसा अर्जासोबत बनावट कागदपत्र जोडल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

- Advertisement -

मलिकांच्या मुलाविरोधात आयपीसीच्या कलम 420, 465, 468, 471, 34 आणि फॉरेनर्स अॅक्ट, 1946 च्या कलम 14 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?

मलिकांचा मुलगा फराज मलिक याने 2 मार्च 2022 ते 23 जून 2022 दरम्यान कुर्ल्यामध्ये बनावट कागदपत्र तयार केली होती. 2020 मध्ये कागदपत्रांमध्ये फेरफार झाली होती. याप्रकरणी एका अधिकाऱ्याने कुर्ला पोलिसांत गुन्हा दाखल केला. पोलिसांच्या माहितीनुसार, या प्रकरणी फराज मलिक आणि हॅमलिन (फ्रेंच महिला) यांच्याव्यतिरिक्त आणखी काही लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हॅमलिन 2020 मध्ये भारतात आली यानंतर तिने व्हिसाची मुदत वाढवण्यासाठी अर्ज केला, पण अर्जासोबत बनावट कागदपत्र जोडली होती. ईडीने फेब्रुवारी 2022 मध्ये नवाब मलिकांविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली, अजूनही ते न्यायालयीन कोठडीत आहेत.


कोकणात आगामी निवडणुकांमध्ये कुणबी समाज बजावणार निर्णायक भूमिका? ‘या’ दोन सभामधून चित्र होणार स्पष्ट

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -