घरमहाराष्ट्र'हे' बेडकासारखे आले कुठून? नारायण राणेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं बोचरं प्रतिउत्तर

‘हे’ बेडकासारखे आले कुठून? नारायण राणेंच्या टीकेला राष्ट्रवादीचं बोचरं प्रतिउत्तर

Subscribe

नारायण राणे यांनी ह्या ज्या काही धमक्या दिल्या आहेत त्या तुमच्या वैयक्तिक आहेत की पक्षाच्या आहेत हे सांगावे... मग आम्ही ठरवू काय करायचे ते असा इशाराही रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे

बंडखोर आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल अशा शब्दात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ट्विटच्या माध्यमातून धमकी वजा इशारा दिला होता. शरद पवारांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत बंडखोर आमदारांना किंमत मोजावी लागेल असा इशारा दिला होतात, त्यावरूनच नारायण राणे यांनी शरद पवारांना डिवचण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही नारायण राणेंवर टीकास्त्र डागले आहे. (NCP leader rupali patil thombare criticize bjp narayan rane over threatening sharad pawar)

नारायण राणे यांना कुणी गंभीरपणे घेत नाही. बंडखोरांना मदत करायला आलेले नारायण राणे हे तुम्ही रचलेले कुरवान आहे. ईडीची कारवाई होऊ नये म्हणून तुम्ही भाजपमध्ये गेलात. आणि आता धुतल्या तांदळाप्रमाणे वागत आहात. अशी टीका राष्ट्रवादींच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केली आहे. यावेळी त्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे.

- Advertisement -

सध्या राज्यात जे सुरु आहे ते सर्व सत्तेसाठी चालू असून या सत्तापिपासू लोकांनी कोणतीही विकासकामे न करता केवळ सत्तेसाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन असे जे काही झटके येत होते. त्यासाठी हे सर्व काही रचून आणले जात आहे असा आरोप फडणवीसांवर केला आहे.

जे कोण आमदार महाविकास आघाडीचे आहेत, शिवसेनेचे आहेत त्यांच्याशी कसे आणि काय बोलायचे हे आम्ही ठरवू, नारायण राणे बेडकासारखे आले कुठून? अशा सवालात बोचरी टीका केली. शिवाय माननीय शरद पवारांना सांगायचा त्यांच्या संबंध आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला, परिस्थिती कितीही गंभीर असली तरी शरद पवार आणि महाविकास आघाडी खंबीर आहे. शिवाय नारायण राणे यांनी ह्या ज्या काही धमक्या दिल्या आहेत त्या तुमच्या वैयक्तिक आहेत की पक्षाच्या आहेत हे सांगावे… मग आम्ही ठरवू काय करायचे ते असा इशाराही रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिला आहे.

- Advertisement -

नारायण राणे यांनी ट्विटमध्ये नेमक काय म्हटले होते?

माननीय शरद पवारसाहेब या सर्वांना देत आहेत, सभागृहात येऊन दाखवा, ते येणारच आहेत. ते येणार आणि त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करणार, बंडखोर आमदारांच्या केसालाही धक्का लावल्यास घर गाठणे कठीण होईल, असं ट्विट नारायण राणे यांनी केले होते.


शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस, मत मांडण्यासाठी दिला 48 तासांचा अल्टिमेटम

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -