राष्ट्रवादीचा लोककलावंतांना मोठा दिलासा, एक कोटी निधी अन् कार्यक्रमांच्या परवानगीचे आश्वासन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १ फेब्रुवारीपासून तमाशाला परवानगी देत असल्याचे अजित पवारांनी जाहीर केले.

Sharad Pawar said about dr babasaheb ambedkar jyotiba phule and we aware thought of Phule Shahu Ambedkar
बाबासाहेबांनी फुलेंचा सन्मान कायम ठेवल्यामुळे फुले-शाहू- आंबेडकर विचार मांडतो, शरद पवारांचे वक्तव्य

कोरोना काळात लॉकडाऊनमुळे आणि आता कार्यक्रमांना परवानगी मिळत नसल्यामुळे लोककलावंतांवर आर्थिक संकट आलं आहे. राज्य सरकारकडून लोककलावंतांना करण्यात आलेली मदत तोकडी पडली आहे. कार्यक्रमांना परवानगी मिळावी तसेच अन्य मागण्यांसाठी लोककलावंतांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादीकडून लोककलावंतांना १ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. तसेच राज्यात कार्यक्रमांना परवानगी देण्याबाबत आश्वासन दिलं आहे. लोककलावंतांनी विविध मागण्यांसाठी आत्मदहन आंदोलन पुकारले होते ते पवारांच्या भेटीनंतर मागे घेण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची लोककलावंतांच्या शिष्ट मंडळाने भेट घेतली होती. शरद पवारांच्या आश्वासनानंतर लोककलावंतांनी आत्मदहन आंदोलन मागे घेण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोककलावंतांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. राष्ट्रवादीने एक कोटी निधी अन् कार्यक्रमांच्या परवानगीचे आश्वासन दिले आहे. राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून राज्यातील तमाशा कलावंताच्या बँक खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपयांची मदत जमा केली जाणार आहे. ट्रस्टचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांच्याकडे तमाशा कलावंताची यादी सुपूर्द केल्यानंतर मदतीचे वाटप सुरु होईल, अशी माहिती आमदार अतुल बेनके यांनी दिली.

तमाशा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये लोककलावंतांनी कार्यक्रमांना परवानगी देण्याची विनंती केली आहे. यानंतर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना तमाशा सुरु करण्याची परवानगी देण्याबाबत विचार करण्याची सूचना केली आहे. अशी माहिती पक्षाच्या चित्रपट,कला व सांस्कृतिक विभागाचे प्रमुख बाबासाहेब पाटील यांनी दिली.

१ फेब्रुवारीपासून तमाशाला परवानगी

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामुळे सामाजिक कार्यक्रम आणि घरगुती कार्यक्रमांवर निर्बंध आले आहेत. गर्दी न करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे. निर्बंधांमुळे लोककलावंतांच्या अडचणी वाढल्या आहेत. लोककलावंतांनी शरद पवारांची भेट घेतली. यानंतर शरद पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करुन लोककलावंतांना दिलासा दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १ फेब्रुवारीपासून तमाशाला परवानगी देत असल्याचे अजित पवारांनी जाहीर केले.


हेही वाचा : मुंबई महापालिकेत केवळ भाजपचंच कमळ फुलणार, आशिष शेलारांचं मोठं विधान