घरताज्या घडामोडीशरद पवारांचा राजीनामा मागे, भाषण जसच्या तसं..

शरद पवारांचा राजीनामा मागे, भाषण जसच्या तसं..

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवड समितीची आज बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या अध्यक्ष निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला. त्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषदेत घेत राजीनामा मागे घेण्याची घोषणा केली. यावेळी शरद पवार पत्रकार परिषदेत काय म्हणाले, त्यांचं भाषण जसच्या तसं –

दिनांक २ मे २०.२३ रोजी लोक माझे सांगाती’ ह्या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर मी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भूमिका होती.

- Advertisement -

परंतु मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसांमध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्त पदाधिकारी व माझे सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषत महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली.

लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनांचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या यांचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने भी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.

- Advertisement -

मी पुन अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदान्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसांपर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम करील.

आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे माझ्या जीवनातील यशापायात सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहिल. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारत असल्याचे पुनः जाहिर करतो. धन्यवाद ।


हेही वाचा : BIG BREAKING : शरद पवारच राष्ट्रवादीचे अध्यक्ष, राजीनामा मागे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -