घरAssembly Battle 2022Assemlby Election results 2022 : पंजाब वगळता सत्ताधाऱ्यांवरच जनतेने विश्वास दाखवला, पवारांकडून...

Assemlby Election results 2022 : पंजाब वगळता सत्ताधाऱ्यांवरच जनतेने विश्वास दाखवला, पवारांकडून केजरीवालांचे कौतुक

Subscribe

पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये आपला चागलं यश मिळाले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पार्टी बहुमताच्या दिशेने वाटचाल करताना दिसत आहे. मोठ्या प्रमाणात पंजाबमधल्या लोकांनी आपला पाठिंबा दिला आहे. शेतकरी आंदोलन सुरु असताना दिल्तील आपने ज्या सुविधा दिल्या त्यामुळे लोकांनी आपला पसंती दिली असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे. तसेच आपचे शरद पवार यांनी कौतुक केलं आहे. आपचे विचार पंजाबच्या लोकांना पटले आहेत. तसेच दिल्लीत ज्या प्रकारे सामान्य नागरिकांचे प्रश्न आपने जाणून घेऊन सोडवले आहेत. त्यामुळे पंजाबवासियांनी आपला मत दिलं आहे. असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच काँग्रेस कुठे कमी पडली हा त्यांचा प्रश्न असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.

पंजाबच्या आणि देशातील ५ राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाबाबत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार म्हणाले की, देशात पाच राज्यांत जी निवडणूक झाली त्यामध्ये ४ ठिकाणी भाजपची सत्ता होती. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. तिथे वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. पण पंजाबमध्ये हा बदल भाजपला अनुकूल आहे. परंतु काँग्रेसला धक्का देणारा आहे. अलिकडे तयार झालेला राजकीय पक्ष, दिल्लीत त्याने गेल्या २ निवडणुकींमध्ये ज्या प्रकारे यश संपादन केलं आहे. तसेच ज्या पद्धतीने प्रशासन दिलं त्याची मान्यता दिल्लीच्या सर्वसामान्य लोकांच्यात आहे. दिल्लीच्या कामाचा परिणाम हा पंजाबमध्ये झाला असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे पंजाब जर सोडलं तर बाकिच्या ठिकाणीसुद्धा लोकांनी विरोधकांना समर्थन देण्याची भूमिका घेतली.

- Advertisement -

पंजाबच्या लोकांचा राग निवडणुकीत दिसला 

काँग्रेसची परिस्थिती पंजाबमध्ये चांगली होती. परंतु त्यांच्यामध्ये काही निर्णय घेतले त्याला पंजाबच्या जनतेनं स्वीकारले आहे. अमरिंदरच्या नेतृत्वात सरकार होते. नंतर नवीन नेतृत्व आणले परंतु हा निर्णय लोकांना आवडला असे दिसत नव्हते. असा निर्णय घेतला नंतर कॅप्टन अमरिंदर यांनी वेगळी पार्टी तयार करुन भाजपला समर्थन दिलं. हे सुद्धा लोकांना आवडले नाही. पंजाबची स्थिती अलग होती, यामुळे सांगतो की, दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनात सगळ्यात मोठा हिस्सा पंजाब, हरियाणाचा होता. पंजाबच्या लोकांच्या मनात जो राग होता तो या निवडणुकीमध्ये दिसला आहे. यामुळे लोकांनी भाजपला आणि काँग्रेसला हरवलं आणि नवीन पक्षाला पाठिंबा देत सत्ता आपच्या हातामध्ये दिली असल्याचे शरद पवार म्हणाले.


हेही वाचा : Punjab Election Results 2022 : काँग्रेसच्या चरणजित सिंग चन्नींचा दोन्ही मतदारसंघातून पराभव, आपच्या उमेदवारांची सरशी

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -