घरमहाराष्ट्रआजारपणामुळे शरद पवार फक्त चार मिनिटंच बोलले; वळसे पाटलांनीच वाचून दाखवलं भाषण

आजारपणामुळे शरद पवार फक्त चार मिनिटंच बोलले; वळसे पाटलांनीच वाचून दाखवलं भाषण

Subscribe

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यामुळे शिर्डीतील (shirdi) राष्ट्रवादीच्या मंथन मेळाव्यात हजर राहणारी की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते, अखेर आजारी असतानाही शरद पवार मेळाव्यात हजर झाले आहेत. पण यावेळी फक्त ते चार मिनिटंच बोलले. त्यांच उर्वरित भाषण राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी वाचून दाखवलं आहे.

यावेळी शरद पवार म्हणाले की, उपचारांनंतर 10 ते 15 दिवसांमध्ये मी पुन्हा नियमित कामाला लागणार आहे, सध्या माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे मी जास्त बोलू शकत नाही. ज्यानंतर दिलीप वळसे पाटील यांनी शरद पवार यांच भाषण वाचून दाखवलं. दरम्यान एखाद्या सभेत केवळ पाच मिनिटं भाषण करण्याची पवारांची ही पहिलीच वेळ असावी, मात्र प्रकृती ठीक नसल्याने त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला नाही. यावेळी

- Advertisement -

शरद पवार थेट रुग्णालयातून डिस्चार्ज घेत शिर्डीतील पक्षाच्या मेळाव्याला हजर झाले. डॉक्टरांच्या टीमसह ते हेलिकॉप्टरने मेळाव्यात आले. दरम्यान शिर्डीहून पुन्हा ते रुग्णालयात दाखल होणार आहेत.

यावेळी पवारांनी कार्यकर्त्यांमध्ये एक नवी उर्जा निर्माण केली. पवार म्हणाले की, तुम्ही राज्यभरातून मोठ्या संख्येनं आला आहात. शिस्तबद्ध पद्धतीने तुम्ही सर्वांचं म्हणणं ऐकून घेत आहात. राज्यात परिवर्तन घडवून आणण्याची ताकद राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात आहे. ही संधी लवकर मिळेल असी आशा आहे, असा कानमंत्र त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. शरद पवारांनी अगदी पाच मिनिटचं कार्यकर्त्यांना संबोधित केले, पण यावेळी त्यांचा आवाज थोडा क्षीण होता, चेहरा निस्तेज दिसत होता, तसेच आजचं भाषण त्यांनी उभ राहून नाही तर बसून केले. त्यांच्या हाताला बँडेज लावलेले दिसत होते.


निवडणुकीआधीच गुजरातमध्ये भाजपाला धक्का; ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -