घरताज्या घडामोडीमुख्यमंत्री कोणाला बनवायचे हे सेना ठरवेल, एकनाथ शिंदेबाबत चर्चाही नाही - शरद...

मुख्यमंत्री कोणाला बनवायचे हे सेना ठरवेल, एकनाथ शिंदेबाबत चर्चाही नाही – शरद पवार

Subscribe

भाजपाने यापूर्वी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मविआ सरकार बनवण्यापूर्वी ही अशी बंडाळी झाली होती. आम्ही विधान परिषदेच्या कालच्या निकालानंतर नाराज नाही.

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेचे आमदार आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यापार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी याआधीही महाराष्ट्राचे सरकार पाडण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटले. शिवाय, त्यांनी सरकार अडीच वर्षे सुरळीत असल्याने सरकार पाडण्याचे षडयंत्र असल्याचेही म्हटले.

दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी विरोधीपक्ष भाजपावर निशाणा साधला. “महाराष्ट्रात सत्तांतराचा हा तिसरा प्रयत्न आहे. भाजपाने यापूर्वी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मविआ सरकार बनवण्यापूर्वी ही अशी बंडाळी झाली होती. आम्ही विधान परिषदेच्या कालच्या निकालानंतर नाराज नाही. अडीच वर्षे सरकार योग्य चालत असल्याने हे षडयंत्र आहे. राजकीय पेचातून मार्ग निघेल सरकार कोसळणार नाही असा मला विश्वास आहे. तसेच, एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्री बनण्याची इच्छा आहे की नाही माहित नाही”, असे त्यांनी म्हटले

- Advertisement -

हेही वाचा – एकनाथ शिंदेंबरोबर 23 नव्हे, तर 30 आमदार, एका क्लिकवर पाहा संपूर्ण यादी

एकनाथ शिंदे मुख्यंत्री होणार का, यावर बोलताना पवारांनी मोठा खुलासा केला. महाविकास आघाडीत शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते ज्याला मुख्यमंत्री करतील, तो आम्हाला मान्य आहे, असं पवार म्हणाले. मात्र उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार चांगलं चालू आहे. आत्ता विधानपरिषदेलाही क्रॉसवोटिंग झालं. ते नेहमी होतं. मात्र सरकारला काही धोका नाही, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिलं.

- Advertisement -

हेही वाचा – मध्य प्रदेश आणि राजस्थान पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, संजय राऊतांचा भाजपला इशारा

एकनाथ शिंदेंबरोबर असलेल्या संभाव्य आमदारांची यादी

1. शहाजी बापू पाटील
2. महेश शिंदे
3. भरत गोगावले
4. महेंद्र दळवी
5. महेश थोरवे
6. विश्वनाथ भोईर
7. संजय राठोड
8. संदीपान भुमरे (मंत्री)
9. उदयसिंह राजपूत
10. संजय शिरसाठ
11. रमेश बोरणारे
12. प्रदीप जैस्वाल
13. अब्दुल सत्तार (मंत्री)
14. तानाजी सावंत
15. किशोर अप्पा पाटील
16. प्रकाश आबीटकर
17. लता सोनवणे
18. योगेश कदम
19. संजय रायमूलकर
20. ज्ञानेश्वर चौगुले
21. बालाजी किणीकर
22. अनिल बाबर
23. शंभूराज देसाई (मंत्री)
24. श्रीनिवास वणगा
25. संजय गायकवाड
26. नितीन देशमुख
27. बालाजी कल्याणकर
28. संतोष बांगर
29. शांताराम मोरे
30. कैलास पाटील घाडगे
31. एकनाथ शिंदे (मंत्री)


हेही वाचा – …तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता- नारायण राणे

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -