घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सुरु; काँग्रेसच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

राष्ट्रवादीची भाजपसोबत बोलणी सुरु; काँग्रेसच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

Subscribe

राष्ट्रवादी अजून तरी आमच्यासोबत आहेत. परंतु आणखी किती दिवस आमच्यासोबत राहतील हे माहिती नाही. कारण भाजपासोबत त्यांची रोज बोलणी सुरु आहेत.- पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडी आता कुठपर्यंत जाणार? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याला कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शरद पवारांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादी पक्षात खळबळ उडालेली असताना आता महाराष्ट्रात खळबळ उडवून देणारा काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी दावा केला आहे.( NCP leader starts talks with BJP Congress leader Prithviraj Chavan big statement )

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, काँग्रेसच्या मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न सुरु आहे. कर्नाटकात भाजपाला विजय मिळणार नाही, ही बाब निश्चित आहे. त्यामुळे जेडीएसला रसद पुरवण्याचं काम भाजपकडून केलं जात आहे. अशातच राष्ट्रवादीनेही कर्नाटकात काँग्रेसविरोधात उमेदवार दिले आहेत. राष्ट्रवादी अजून तरी आमच्यासोबत आहेत. परंतु आणखी किती दिवस आमच्यासोबत राहतील हे माहिती नाही. कारण भाजपासोबत त्यांची रोज बोलणी सुरु आहेत.

- Advertisement -

चव्हाण म्हणाले की, रोज बातम्या येतात, कोणता नेता जाणार आणि कोण थांबणार. त्यांनाी काय निर्णय घ्यायचा हे त्यांचे ते बघतील. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाला आहे. त्यामुळे इतर राज्यात जाऊन मतांची टक्केवारी वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरु आहे. पुन्हा राष्ट्रीय दर्जा मिळेल यासाठी मतांची टक्केवारी वाढवण्याकरता ते निवडणूक लढवत आहेत. परंतु भाजपची टक्केवारी वेगळी आणि राष्ट्रवादीची टक्केवारी वेगळी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला तुम्ही फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही, असंही चव्हाण यावेळी म्हणाले.

( हेही वाचा: निवृत्तीच्या निर्णयाचा शरद पवार दोन-तीन दिवसांत फेरविचार करणार – अजित पवार )

- Advertisement -

चव्हाणांच्या दाव्यावर राऊतांची प्रतिक्रिया

पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यावर संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मला त्याविषयी माहिती नाही. मला इतकंच माहित आहे की महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्र आहोत. काल आपण आमची एकी आणि वज्रमूठ पाहिली. काल व्यासपीठावर अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, अशोक चव्हाण, असे सगळे प्रमुख नेते उपस्थित होते, असं संजय राऊत म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -